मुंबई महापालिकेचे महालेखा परीक्षकांकडून विशेष ऑडीट करणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

देवेंद्र फडणवीस

मुंबई, २५ ऑगस्ट (वार्ता.) – मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांची महालेखा परीक्षकांकडून (कॅगकडून) विशेष ऑडीट करण्यात येईल. महापालिकेतील घोटाळ्यांच्या काही आरोपांची नगरविकास विभागाच्या अधिकार्‍यांकडून चौकशी करण्यात येईल. चौकशीचा फार्स न करता आरोपांची चौकशी कालबद्धतेने पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेचा हवाला देत गृहमंत्री म्हणाले की, मुंबईतील सर्व १ सहस्र २०० किलोमीटरच्या रस्त्यांचे पुढील ३ वर्षांत काँक्रीटकरण करून महापालिकेतील खड्ड्यांचे ‘अर्थकारण’ बंद करण्यात येईल. मुंबई महापालिकेतील २९ सहस्र स्वच्छता कर्मचार्‍यांना मालकी हक्काची घरे देण्यात येतील.