मुंबई, २५ ऑगस्ट (वार्ता.) – राज्यात संरक्षित आणि असंरक्षित अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. हा आपल्या अभिमानाचा वारसा आहे. या वास्तूंमधून आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. या सर्व ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा नियोजन निधीतील ३ टक्के निधी देण्याची तरतूद करण्यात येईल. जिल्हा नियोजन निधीतून ३ वर्षांत यासाठी १ सहस्र कोटी रुपये उपलब्ध होतील, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २५ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत दिली. बुलढाणा जिल्ह्यातील राजमाता जिजाऊ यांच्या सिंदखेडराजा येथील जन्मस्थळाच्या ठिकाणी विविध सुविधा देण्याविषयीची लक्षवेधी काँग्रेसचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उपस्थित केली होती.