शालेय शुल्कवाढीच्या विरोधात शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्याची पालकांना मुभा !

प्रतिवर्षी खासगी शाळा मनमानी पद्धतीने शुल्कवाढ करतात आणि पालकांना हतबल व्हावे लागते, यावर सरकारने कायमचा तोडगा काढावा !

श्री महालक्ष्मी मंदिराच्या दानपेटीत ८३ लाख रुपयांचे दान !

श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांनी दिलेल्या दानपेटीतील दानाची मोजणी करण्यात आली. १४ जून या दिवशी ३६ लाख ३१ सहस्र २०० रुपये, तर १५ जून या दिवशी उर्वरित पेट्यांमधून ४७ लाख ४३ सहस्र ४६४ रुपयांचे दान मिळाले. दोन दिवसांची एकूण रक्कम ८३ लाख ७४ सहस्र ६६४ रुपये झाली.

जी.आय.एस्. मॅपिंगसाठी नेमलेल्या आस्थापनांना पावणेतीन कोटी रुपयांचा दंड !

शहरातील मिळकतकराची माहिती घेण्यासाठी आस्थापनांनी चुकीच्या पद्धतीने काम केल्याने अनेक मिळकतधारकांची ४० टक्केची सवलत रहित झाली आहे. यामुळे नागरिकांना मिळकत कराची ज्यादा रकमेची देयके आल्याने महापालिका प्रशासनावर प्रचंड टीका होत आहे.

शिवसेनेचा वर्धापनदिन यंदाही ‘ऑनलाईन’ ! – संजय राऊत, खासदार

कोरोनामुळे शिवसेनेचा वर्धापनदिन मागील २ वर्षांप्रमाणे याही वर्षी १९ जून या दिवशी ‘ऑनलाईन’ पद्धतीने साजरा होणार आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

धर्मांतराचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मी जाती-धर्मांत भेदभाव करत नाही. कुणीही लोकांचे आमिषे दाखवून धर्मांतर करू शकणार नाही. यापुढे अशा कृत्यांना राज्यात अजिबात थारा दिला जाणार नाही, तरीही कुणी ऐकत नसेल, तर राज्यात धर्मांतरबंदी कायदा आणावा लागणार आहे.

श्री रुक्मिणीदेवीच्या चरणांचे पुरातत्व विभागाकडून संवर्धन !

विविध क्षेत्रांतील अडचणींवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेतले जाते. मंदिर हा हिंदु धर्माशी संबंधित विषय आहे. त्यामुळे मूर्तीची झीज आणि त्यांवरील उपायांच्या संदर्भात हिंदु धर्मातील अधिकारी व्यक्ती, म्हणजे शंकराचार्य, संत, धर्माचार्य आदींचे मार्गदर्शन…

सोलापूर येथे अन्न आणि औषध प्रशासनाने १ कोटी ३१ लाख रुपयांचा गुटखा जाळला !

१७ ठिकाणी संयुक्त कारवाई करून अन्न आणि औषध प्रशासनाने जप्‍त केलेला अनुमाने १ कोटी ३१ लाख रुपयांचा गुटखा आणि सुगंधी सुपारी यांचा साठा १४ जून या दिवशी जाळून नष्ट केला.

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे ‘मानवी हक्क आणि संरक्षण जागृती’च्या वतीने स्त्रिया आणि पुरुष यांच्याकडून वटपौर्णिमा साजरी !

जनतेला धर्मशिक्षण नसल्यामुळे अशा चुकीच्या कृती केल्या जात आहेत. पुरुषांनी वटपौर्णिमा साजरी करणे, हे एकप्रकारे पवित्र ‘वटपौर्णिमा’ व्रताचे विडंबनच होय ! प्रत्येक वेळी हिंदूंच्या सण-उत्सवांचा अपमान करणारे हिंदूच हिंदु धर्माचे वैरी आहेत !

(म्हणे) ‘वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्यापेक्षा नवऱ्याच्या नावाचे झाड लावा !’ – अभिनेत्री हेमांगी कवी यांचे विधान

हिंदूंच हिंदु धर्माचे खरे वैरी ! अशा जन्महिंदूंनी आपले धार्मिक सण, व्रते यांविषयीचे शास्त्र समजून न घेता काहीही बरळणे, ही सध्या ‘स्टंटबाजी’ झाली आहे. सवंग प्रसिद्धीसाठी अशी मुक्ताफळे उधळणाऱ्यांना हिंदूंनी वेळीच संघटितपणे खडसावल्यास अशा गोष्टींना आळा बसेल !

(म्हणे) ‘वटपौर्णिमा केवळ सुवासिनींचा सण नाही, त्यामुळे विधवा महिलांनीही वटपौर्णिमा साजरी करावी !’ – तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड

शास्त्र समजून न घेता केवळ प्रसिद्धीच्या झोतात रहाण्यासाठी प्रत्येक वेळी हिंदु प्रथा-परंपरा यांची खिल्ली उडवली जात आहे आणि धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु समाज त्याला बळी पडत आहे, हे दुर्दैवी आहे !