ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान मुळदे येथे कार्तिकस्वामी दर्शन सोहळा

तालुक्यातील ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान मुळदे येथील नवनाथ उपासक प.पू. श्री बाळकृष्ण महादेव घडशी महाराज यांच्या ‘तपोभूमी’ येथे कार्तिकस्वामी दर्शन सोहळा असणार आहे. कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र एकत्र असतांना स्त्रियांसाठी कार्तिकस्वामी दर्शनाचा योग असतो.

कोरोना महामारीच्या काळात कर्मचार्‍यांना वेतन आणि दिवाळी बोनस देणार्‍या कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्‍वस्त मंडळाचे पंचक्रोशीतून कौतुक

कोरोना महामारीच्या काळात श्री कानिफनाथ देवस्थानकडून करण्यात आले सामाजिक कार्य

नाडण येथे टेम्पोच्या धडकेने मुलाचा मृत्यू

चि. सोहम् याला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे घोषित केले.

कोरोनाची चाचणी न करताच शाळेत उपस्थित झालेले शिक्षक कोरोनाबाधित आढळले

सरकारच्या निर्देशांनुसार कोरोनाविषयक नियमांचे पालन करून २३ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील शाळा चालू करण्यात आल्या आहेत. कोरोना चाचणी करून शिक्षकांना उपस्थित रहाण्याचे आदेश आहेत; परंतु चाचणी न करताच येथील एका नामांकित माध्यमिक शिक्षण संस्थेत एक शिक्षक २३ नोव्हेंबर या दिवशी शाळेत उपस्थित झाले.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणा ! – विशालसिंग राजपूत, शिवसेना

शहरप्रमुख श्री. विशालसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शहर कार्यालयात पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पांजरपोळ येथे गोपूजन आणि गायींना चारा वाटप

श्री. राजेश क्षीरसागर यांच्यासह पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर यांनी श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले.

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते धोंडीराम भोपळे-गुडाळकर आणि मित्रमंडळ यांच्याकडून ऊस तोडणी कामगारांना दीपावली फराळ वाटप

हिंदुत्वनिष्ठ श्री. धोंडीराम भोपळे-गुडाळकर आणि मित्रमंडळ यांच्याकडून बसस्थानक परिसर, तसेच पंचगंगा साखर कारखान्यावरील ऊसतोडणी कामगारांना फराळ वाटप करण्यात आले.

निधन वार्ता

जिल्ह्यातील कांदिवली येथील सनातनच्या साधिका सौ. अनिता विनय शहाणे यांचे पती विनय वसंत शहाणे (वय ५८ वर्षे) यांचे २३ नोव्हेंबरला रात्री दीर्घकालीन आजाराने निधन झाले.

पाकिस्तानच्या विरोधातील संतप्त निदर्शनात पाकच्या ध्वजाची होळी

करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने हुतात्मा सैनिक संग्राम पाटील आणि ऋषिकेश जोंधळे यांना श्रद्धांजली

अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या तरुणाचे पैशाच्या वादावरून अपहरण !

एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून रिक्शातून त्याला शहरात फिरवले जाते. तरीसुद्धा पोलिसांना थांगपत्ता लागत नाही, यावरून शहरात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे का, अशी शंका सामान्य नागरिकांना आल्यास चूक ते काय ? – संपादक