पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणा ! – विशालसिंग राजपूत, शिवसेना

बैठकीत पदाधिकार्‍यांशी संवाद साधतांना श्री. विशालसिंह राजपूत आणि शिवसैनिक

मिरज, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – आगामी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ यांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने शहरप्रमुख श्री. विशालसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शहर कार्यालयात पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणावेत, शिवसेना वाढीसाठी अधिकाधिक सभासद नोंदणी आणि शाखा चालू करण्याची घोषणा शहरप्रमुख श्री. विशालसिंह राजपूत यांनी केली. बैठकीत सूत्रसंचालन युवानेते श्री. कुबेरसिंह राजपूत यांनी केले. या वेळी सर्वश्री महेश लोंढे, उल्हास मोरे, बाळ हात्तेकर, उमेश आवळे, लखन भोरे यांसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.