कोरोनाची चाचणी न करताच शाळेत उपस्थित झालेले शिक्षक कोरोनाबाधित आढळले

बेडग (जिल्हा सांगली) – सरकारच्या निर्देशांनुसार कोरोनाविषयक नियमांचे पालन करून २३ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील शाळा चालू करण्यात आल्या आहेत. कोरोना चाचणी करून शिक्षकांना उपस्थित रहाण्याचे आदेश आहेत; परंतु चाचणी न करताच येथील एका नामांकित माध्यमिक शिक्षण संस्थेत एक शिक्षक २३ नोव्हेंबर या दिवशी शाळेत उपस्थित झाले. तपासणीनंतर ते शिक्षक कोरोनाबाधित आढळून आले. या कोरोनाबाधित शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांची ऑक्सिमीटरने स्वतः पडताळणी केली होती. येथील उपस्थित सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक यांच्या संपर्कात कोरोनाबाधित शिक्षक आल्याने २४ नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा १४ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.