नाडण येथे टेम्पोच्या धडकेने मुलाचा मृत्यू

प्रतिकात्मक चित्र

देवगड – तालुक्यातील नाडण येथे भरधाव टेम्पोच्या धडकेने सोहम् समीर मिराशी या ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात २६ नोव्हेंबरला सकाळी घडला. चि. सोहम् आणि त्याचे आजोबा नाडण येथील ‘मिराशी हॉटेल’ समोरील रस्त्यावरून मोंडच्या दिशेने जात होते. त्या वेळी मागून आलेल्या एका भरधाव टेम्पोने चि. सोहम् याला जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर घायाळ झालेल्या चि. सोहम् याला देवगड येथे खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे घोषित केले.