जापानमध्ये संसदेत अनुपस्थित रहाणार्‍याची खासदारकी रहित !

भारतात संसदेत गदारोळ करणार्‍यांची खासदारकी रहित होत नाही, तेथे अनुपस्थित रहाणार्‍याची कधीतरी होईल का ?

ब्रिटनच्या पंतप्रधानांनाही पोलिसांनी करवून दिली नियमांची जाणीव !

भारतात लोकप्रतिनिधींच्या संदर्भात असे कधीतरी होऊ शकते का ?

पाकिस्तानातून आलेल्या २२ हिंदूंना मध्यप्रदेशमध्ये तात्पुरते रहाण्याची अनुमती !

या सर्व निर्वासितांना मध्यप्रदेशमधील धार जिल्ह्यात रहाण्यासाठी जागा देण्यात आली आहे.

ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथील भारतीय दूतावासाच्या प्रवेशद्वारावर खलिस्तानवाद्यांचे आंदोलन !

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी भारतियांचे संरक्षण करण्याचे आश्‍वासन देऊनही अशा घटना घडत असतील, तर आता भारत सरकारने ऑस्ट्रेलियावर दबाव आणून तेथील हिंदूंचे रक्षण करण्यास भाग पाडले पाहिजे !

एरिक गार्सेट्टी भारतातील अमेरिकेचे राजदूत नियुक्त !

गेल्या २ वर्षांपासून हे पद रिक्त होते. इतके दिवस हे पद रिक्त रहाण्याची ही पहिलीच वेळ होती. एरिक गार्सेटी पूर्वी लॉस एंजेलिसचे शहराचे महापौर होते.

अमेरिकेतील आणखी एक बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर !

‘ब्लूमबर्ग’ या संस्थेच्या मते फर्स्ट रिपब्लिक बँकेच्या शेअरच्या मूल्यांमध्ये ६१.८३ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.

‘अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग’ असणारे विधेयक अमेरिकेच्या संसदेत संमत

अमेरिकेने तिच्या संसदेत एक विधेयक संमत करून ‘अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे’, असे म्हटले आहे. भारतातील अरुणाचल प्रदेश आणि चीन यांच्यामधील मॅकमोहन रेषेला आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून अमेरिकेने या विधेयकाद्वारे मान्यता दिली आहे.

चीनने तैवानशी युद्ध केल्यास तैवानच्या बाजूने लढणार्‍या अमेरिकेचा स्फोटकांचा साठा एका सप्ताहात संपेल ! – अहवालातील खुलासा

तैवानवरून अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव वाढत चालला असून येत्या काळात त्याचे युद्धात रूपांतर होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ‘फोर्ब्स’च्या एका अहवालानुसार, चीनच्या तुलनेत अमेरिकेचे आक्रमण करण्याचे सामर्थ्य अल्प झाले आहे.

आम्ही अमेरिकेचे ड्रोन पाडलेले नाही ! – रशिया

रशियाच्या लढाऊ विमानांनी १५ मार्चला अमेरिकेचे ड्रोन ‘एम्क्यू-९’ पाडले, असा आरोप अमेरिकेने केला आहे.

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अद्यापही अटक नाही !

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्याचे प्रयत्न गेल्या २४ घंट्यांपासून पाकिस्तानचे पोलीस करत आहेत. पोलीस लाहोर येथील जमान पार्कमध्ये इम्रान खान यांच्या अटकेसाठी पोचलेले आहेत; मात्र त्यांच्या समर्थकांकडून होत असलेल्या हिंसारचारामुळे पोलीस इम्रान यांना अटक करू शकलेली नाहीत.