ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथील भारतीय दूतावासाच्या प्रवेशद्वारावर खलिस्तानवाद्यांचे आंदोलन !

ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) – येथील भारतीय दूतावासाच्या बाहेरील प्रवेशद्वारावर २० ते २५ खलिस्तानवाद्यांनी १५ मार्चला सायंकाळी आंदोलन करत द्वार बंद केले. त्यांच्या हातात खलिस्तानचे झेंडे, कापडी फलक आणि भित्तीपत्रके होती. ते घोषणाबाजी करत होते. त्यामुळे एकही नागरिक दूतावासात प्रवेश करू शकला नाही. परिणामी दूतावासात कामही होऊ शकले नाही.

मागच्या आठवड्यात भारताच्या दौर्‍यावर आलेले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ऑस्ट्रेलियात मंदिरे आणि भारतीय यांचे रक्षण केले जाईल’, असे आश्‍वसन दिले होते.

संपादकीय भूमिका

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी भारतियांचे संरक्षण करण्याचे आश्‍वासन देऊनही अशा घटना घडत असतील, तर आता भारत सरकारने ऑस्ट्रेलियावर दबाव आणून तेथील हिंदूंचे रक्षण करण्यास भाग पाडले पाहिजे !