भक्ती करूया देवीच्या नवरूपांची ।

भक्ती करूया देवीच्या नवरूपांची ।
वाढवू शक्ती अंतर्मनाची ।। १ ।।

अधिवक्त्या सौ. अपर्णा कुलकर्णी

पालन करूनी धर्माचे ।
आचरण करू हिंदु संस्कृतीचे ।। २ ।।

नको वागणे स्वैराचाराचे ।
जागरण करू नवदुर्गेचे ।। ३ ।।

शिक्षण घेऊन स्वसंरक्षणाचे ।
निर्दालन करूया दुष्प्रवृत्तींचे ।। ४ ।।

ज्ञान देऊन धर्माचे ।
घडवू आयुष्य पुढच्या पिढीचे ।। ५ ।।

साजरी करून नवरात्री ।
जागृत करूया स्त्री शक्ती ।। ६ ।।

आशिष घेऊ दुर्गामातेचे ।
साकार करू स्वप्न हिंदु राष्ट्राचे ।। ७ ।।

– अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी, दापोली, जि. रत्नागिरी.