
कपडे झाले छोटे । लाज कुठून येणार ।। १ ।।
धान्य झाले ‘हायब्रीड’ (टीप) । अंगात बळ कुठून येणार ।। २ ।।
फुले झाली प्लास्टिकची । सुगंध कुठून येणार ।। ३ ।।
चेहरा झाला ‘मेकअप’चा । रूप कुठून येणार ।। ४ ।।
नदी झाली गटार । पाणी कुठून येणार ।। ५ ।।
नाती झाली स्वार्थी । आधार कुठून येणार ।। ६ ।।
प्रेम झाले वासना । त्याग कुठून येणार ।। ७ ।।
माणूस झाला पाषाण । भावना कुठून येणार ।। ८ ।।
हिंदु राष्ट्र येता । ही स्थिती पालटणार ।। ९ ।।
टीप – हायब्रीड – संकरीत
– एक साधक (२१.२.२०२४)