
न उरले पावित्र्य न उरले चारित्र्य ।
केवळ आचार विचारांचे वैचित्र्य ।। १ ।।
नाही ज्ञानाची पिपासा, तृषा ।
नाही बोलता येते स्वतःची मातृभाषा ।। २ ।।
नाही थोरा-मोठ्यांविषयी कृतज्ञता, आदर ।
शालीनता, नम्रता नाही, केवळ पोसला अहंकार ।। ३ ।।
धर्म जगतात, पाळतात, अशिक्षित पशूपक्षी ।
सुशिक्षित मानव मात्र सर्व ते दुर्लक्षी ।। ४ ।।
याला कारण सदोष संस्कारशून्य शिक्षण ।
आणि तद्वत् सर्व पाल्यांचे पालकजन ।। ५ ।।
थोर सुपुत्रांच्या कर्तृत्वाने भारतमाता ओळखली जाते ।
अन् त्यांच्याच नावाने तिथी ही महान होते ।। ६ ।।
जसे प्रभु श्रीरामांच्या नावाने रामराज्य ।
अन् रामनवमी हे जणू तिथीचे भाग्य ।। ७ ।।
सर्व कलंक धुवून टाकूनी चारित्र्यसंपन्न होऊया ।
प्रभु श्रीराम आत्मसात् करूनी रामराज्य स्थापूया ।। ८ ।।
तेच असेल हिंदु राष्ट्र, रामराज्य सनातन ।
तीच खरी रामनवमी, तेच गीत रामायण ।। ९ ।।
– श्री. द.र. पटवर्धन, कोलगाव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.