पोलिसी बळाचा वापर करून सर्वेक्षण करू नका !- अजित पवार

रिफायनरी प्रकल्पाच्या माती परीक्षणाच्या कामाला ग्रामस्थांनी दुसर्‍या दिवशी म्हणजे २५ एप्रिललाही विरोध चालू ठेवला आहे. ग्रामस्थांचा मोठा विरोध असतांना प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात माती सर्वेक्षणाला प्रारंभ केला आहे.

महाराष्ट्रातला पहिला सोलर प्रकल्प रत्नागिरीत होणार ! – पालकमंत्री उदय सामंत

महाराष्ट्रातला पहिला सोलर प्रकल्प रत्नागिरीत होत आहे. हा प्रकल्प झाल्यावर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या हद्दीतील २ पथदिव्यांचे वीजदेयक शून्य होणार आहे.

पंजाबमध्ये गुरुद्वारात घुसून एका तरुणाने केला गुरु ग्रंथसाहिबचा अवमान !

‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती’चे अध्यक्ष हरजिंदर सिंह धामी यांनी आरोपीच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात ६ वर्षीय हिंदु मुलीचे लैंगिक शोषण !

सिंध प्रांतातील एका गावात हिंदु मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे. एका ६ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण करण्यात आले.तिला घायाळ अवस्थेत रुग्णालयात भरती करण्यात आले.

हम्पी (कर्नाटक) येथे हनुमान मंदिराच्या आवारात मुसलमानांकडून मांसाहार !

श्री. गौडा यांनी या घटनेशी संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि हिंदु मंदिरांमध्ये अहिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालावी’, अशी मागणी केली.

(म्हणे) ‘पूर्व लद्दाखमध्ये भारत-चीन यांच्यातील संघर्षावर उपाय काढू !’ – चीन

कावेबाज चीनच्या या वक्तव्यावर भारताने विश्‍वास न ठेवता त्याच्या विरोधात कायम आक्रमक भूमिका घेणे आवश्यक !

राज्यातील सर्व ग्रामपंचायती चालणार सौरऊर्जेवर, राज्यशासन गाठणार उद्दिष्ट !

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ अंतर्गत भविष्यात राज्यातील सर्व ग्रामपंचायती सौरऊर्जेवर चालवण्याचा महत्त्वकांक्षी टप्पा गाठण्याचे प्रयत्न राज्यशासनाकडून चालू करण्यात आले आहेत.

भारतियांना पाकिस्तान नाही, तर चीन सर्वांत मोठे आव्हान वाटते ! – अमेरिकेतील खासदार रो खन्ना

भारतीय लोक पाकिस्तानऐवजी चीनला सर्वांत मोठे सैनिकी आव्हान मानतात, असे विधान अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार रो खन्ना यांनी केले आहे.

(म्हणे) ‘गेल्या निवडणुकीत मी ‘हिंदुविरोधी’ असल्याचा अपप्रचार करण्यात आला !’ – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

गोहत्येचे जाहीर समर्थन करणारे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना हीन लेखणारे आणि क्रूरकर्मा टिपू सल्तानचा उदोउदो करणारे सिद्धरामय्या हे हिंदुविरोधीच होते आणि आहेत, हे सुज्ञ हिंदु जनता ओळखून आहे !

‘बाळूमामा देवस्थान’चे विश्‍वस्त मंडळ विसर्जित : प्रशासकपदी शिवराज नाईकवाडे यांची नियुक्ती

आदमापूर (तालुका भुदरगड) येथील बाळूमामा देवस्थान मंदिराच्या विश्‍वस्त मंडळाच्या कारभाराच्या विरोधात भक्तांकडून धर्मादाय आयुक्तांकडे विविध तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल २४ एप्रिलला लागला आणि यानंतर ‘बाळूमामा देवस्थान’चे विश्‍वस्त मंडळ विसर्जित करण्याचा आदेश देण्यात आला आहे.