पंजाबमध्ये गुरुद्वारात घुसून एका तरुणाने केला गुरु ग्रंथसाहिबचा अवमान !

रोपड (पंजाब) – पंजाबमध्ये पुन्हा एकदा गुरु गंथसाहिबचा अवमान झाल्याची घटना समोर आली आहे. येथील एक शीख तरुण चपला घालून गुरुद्वारमध्ये घुसला आणि त्याने गुरु ग्रंथसाहिबजवळ बसलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. या वेळी त्याने गुरु ग्रंथसाहिबचा अवमान केला.

गुरुद्वारमध्ये उपस्थित लोकांनी तरुणाला पकडून बेदम मारहाण केली. याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली. या घटनेमुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती’चे अध्यक्ष हरजिंदर सिंह धामी यांनी आरोपीच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.