पाकिस्तानच्या सिंध प्रांतात ६ वर्षीय हिंदु मुलीचे लैंगिक शोषण !

 हिंदु मुलीचे लैंगिक शोषण

कराची (पाकिस्तान) – सिंध प्रांतातील टांडो अल्लायार जिल्ह्यात असलेल्या शेख भिरकियो गावात एका हिंदु मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे. एका ६ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण करण्यात आले. नंतर घरापासून ६ किलोमीटर अंतरावर एके ठिकाणी ती बेशुद्धावस्थेत पडल्याचे आढळून आले. तिला घायाळ अवस्थेत रुग्णालयात भरती करण्यात आले. तिचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आल्यावर एका २३ वर्षीय वासनांध मुसलमान युवकाला अटक करण्यात आली आहे.

टांडो अल्लायार जिल्ह्यात रहाणार्‍या हिंदूंच्या विरोधात धर्मांध मुसलमानांकडून याआधीही आक्रमणे झाल्याच्या घटना वेळोवेळी समोर आल्या आहेत.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानातील असुरक्षित हिंदू !