हम्पी (कर्नाटक) येथे हनुमान मंदिराच्या आवारात मुसलमानांकडून मांसाहार !

दोषींवर कठोर कारवाई करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी !

हम्पी (कर्नाटक) – राज्यातील विजयनगर जिल्ह्यात असलेल्या जगप्रसिद्ध हम्पी या प्राचीन शहरातील अंजनेयस्वामी (हनुमान) मंदिराच्या आवारात मुसलमान लोक मांसाहार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनी ट्वीट केला आहे. तो सामाजिक माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून या घटनेच्या विरोधात सहस्रावधी हिंदू संताप व्यक्त करत आहेत.

याविषयी श्री. गौडा यांनी ‘मांसाहाराला बंदी असलेल्या ठिकाणी मांसाहार करणे धक्कादायक आहे. या घटनेशी संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि हिंदु मंदिरांमध्ये अहिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालावी’, अशी मागणी विजयनगर जिल्हा पोलीस आणि भारतीय पुरातत्व विभाग यांच्याकडे ट्वीटद्वारे केली.

विजयनगर साम्राज्याचे वंशज श्रीकृष्ण देवराय यांच्याकडूनही निषेध !

विजयनगर साम्राज्याचे मूळ वंशज श्रीकृष्ण देवराय यांनी ट्वीट करून या घटनेचा निषेध केला आहे. हम्पीचे पावित्र्य जपले जावे आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

  • मंदिरांचे पावित्र्य नष्ट करण्याच्या घटना वारंवार घडणे हिंदूंना लज्जास्पद !
  • हिंदू निद्रिस्त असल्यानेच कुणीही उठतो आणि हिंदूंच्या धर्मश्रद्धांवर आघात करतो. कधी मशीद किंवा चर्च येथे अशा घटना घडल्याचे ऐकिवात आहे का ?