मुंबई – लोकसभेच्या निवडणुकीसाठी राज्यात एकही मुसलमान उमेदवार दिला नसल्याचे कारण देत काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी काँग्रेसच्या मुख्य प्रचारकपदाचे त्यागपत्र दिले आहे. मुंबईमध्ये उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारीसाठी नसीम खान इच्छुक होते; मात्र काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी घोषित केली आहे. यामुळे दुखावलेल्या नसीम खान यांनी मुख्य प्रचारकपदाचे त्यागपत्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुग खर्गे यांना पाठवले आहे. नसीम खान ‘एम्.आय.एम्.आय.एम्.’कडून उमेदवारी लढवणार असल्याची चर्चा चालू आहे.