कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचे २० नोव्हेंबरपर्यंत २४ घंटे दर्शन !

१२ नोव्हेंबर या दिवशी असलेल्या कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणीदेवी यांचे २४ घंटे दर्शन चालू करण्यात आले असून ते २० नोव्हेंबरपर्यंत चालू रहाणार आहे. ४ नोव्हेंबरला विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला.

दौंड (पुणे) येथे गोरक्षकांनी केलेल्या कारवाईत १६ बैलांची सुटका !

गोवंश हत्याबंदी कायद्याचा काही उपयोग आहे कि नाही ?

सलमान खानला ठार मारण्याची धमकी देणारा तरुण अटकेत !

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सलमान खान याला ठार मारण्याची धमकी देणारा विक्रम (वय ३५ वर्षे) याला कर्नाटक येथून अटक करण्यात आली आहे.

रावेत (पुणे) येथील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील मोटारचालकाला अटक !

अपघातानंतर मोटारचालक आदित्य हा घटनास्थळी न थांबता गाडीसह पसार झाला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रावेत पोलिसांनी परिसरातील ८० सीसीटीव्हींचे चित्रीकरण पडताळले. त्यातून आरोपीचा शोध लागला.

ठाणे येथे वाहनाच्या टपावरून फटाके फोडणार्‍यांविरोधात गुन्हा नोंद !

निळकंठ भागात चालत्या वाहनांच्या टपावरून काही तरुणांनी फटाक्यांचा खोका हातात पकडून फटाके फोडले. याविषयाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

पुणे विमानतळावरील विविध विमानांमध्ये बाँब ठेवल्याची अफवा !

बाँब ठेवल्याची अफवा पसरवणार्‍यांना जोपर्यंत कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत !

६० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व शासकीय सवलती लागू कराव्यात ! – देवेंद्र भुजबळ, माजी राज्य माहिती संचालक

महाराष्ट्र राज्यात सध्या ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लागू असणार्‍या शासनाच्या सर्व सवलती ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लागू करण्यात याव्यात, अशी मागणी माजी राज्य माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी सानपाडा येथे एका कार्यक्रमात केली.

पाळधी (जळगाव) ते शेगाव दिंडीत भजन म्हणणे, वाद्य वाजवणे याला पोलिसांचा विरोध !

हिंदूंना सुरक्षितपणे, तसेच मोठ्या उत्साहात दिंडी काढता यावी, यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

जळगाव येथे २ बसगाड्यांचा अपघात !

येथे राज्य परिवहन महामंडळाच्या २ बसगाड्यांचा सकाळी १०.३० वाजता भीषण अपघात झाला. दोन्ही बसगाड्या समोरासमोर धडकल्याने अपघात झाला असून यात २५ ते २७ प्रवासी घायाळ झाले आहेत.

भाजप संपवण्याची भाषा करणार्‍या अब्दुल सत्तार यांच्या प्रचारावर बहिष्कार ! – कमलेश कटारीया, भाजप

भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिले असून भाजप संपवण्याची भाषा करणार्‍या अब्दुल सत्तार यांच्या प्रचारावर बहिष्कार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे सिल्लोड शहराध्यक्ष कमलेश कटारीया यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली आहे.