मुंबई – उत्तर-मध्य मुंबईमधील भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. या मतदारसंघात भाजपकडून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. वर्ष १९९३ मध्ये मुंबईवर झालेला अतिरेकी आक्रमणाचा खटल्यामध्ये सरकारच्या वतीने उज्ज्वल निकम यांनी अधिवक्ता म्हणून काम पाहिले होते. या आक्रमणातील अतिरेकी कसाब याला फाशीची शिक्षा होण्यामध्ये उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. या मतदारसंघात काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.