अभिनेते सलमान खान यांच्या घरावर गोळीबार केल्याचे प्रकरण
(फरार गुन्हेगाराला आंतराष्ट्रीय विमानतळे, बंदर या ठिकाणांहून पकडता यावे, यासाठी ‘लुक आऊट’ नोटीस बजावली जाते.)
मुंबई – अभिनेते सलमान खान यांच्या घरावर गोळीबार करण्याचा कट रचून त्याचे दायित्व घेणारा कुख्यात गुंड अनमोल बिश्नोई याच्या विरोधात मुंबई पोलिसांनी ‘लुक आऊट’ नोटीस प्रसारित केली. लॉरेन्स बिश्नोई टोळी सध्या परदेशात असलेला अनमोल बिश्नोई चालवत असून अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबुक खात्यावरून एक पोस्ट अपलोड करून या आक्रमणाचे दायित्व स्वीकारल्याचे सांगण्यात आले. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येच्या प्रकरणात सहभागी असलेल्या अनमोल याने हा गोळीबार सलमान खानसाठी पहिली आणि शेवटची चेतावणी असल्याचे सांगून ‘यापुढे भिंतींवर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत’, असे धमकावले होते.