चीनमध्ये आईस्क्रीममध्येही आढळले कोरोनाचे विषाणू !

चीनमध्ये आईस्क्रीममध्येही कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत. या आईस्क्रीमच्या ३९० डब्यांची विक्री करण्यात आली असून खरेदी करणार्‍या नागरिकांचा शोध घेतला जात आहे.

श्रीराममंदिर उभारणीसाठी अवैध देणगी गोळा केल्यावरून राष्ट्रीय बजरंग दलाच्या विरोधात गुन्हा नोंद

अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या श्रीराममंदिरासाठी अवैधरित्या देणगी गोळा केल्याच्या आरोपावरून येथील पोलिसांनी राष्ट्रीय बजरंग दलाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

बेळगाव येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गेलेले आरोग्य राज्यमंत्री यड्रावकरांना कर्नाटक पोलिसांनी रोखले

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर कोगनोळी टोलनाक्यावर अडवले. त्यांनी कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला आहे.

आज ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल

सावंतवाडी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल १८ जानेवारी या दिवशी स्पष्ट होणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला आरंभ होणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींसाठी वेगळे पटल असून १ घंट्यात निकाल स्पष्ट होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले.

धावत्या लोकलमधून हिंदु पत्नीला ढकलून देणार्‍या धर्मांधाला अटक

कायद्याचे भय नसलेल्या अशा धर्मांधांवर कठोर कारवाई झाल्यासच त्यांच्यावर वचक बसेल आणि हिंदु मुलींचे जीव वाचतील ! धर्मांधांच्या प्रेमाच्या प्रलोभनांना बळी पडून त्यांच्याशी निकाह करणार्‍या हिंदु तरुणी यातून काही बोध घेतील का ?

औरंगजेबाप्रती प्रेम कशासाठी ?

औरंगाबादला संभाजीनगर संबोधणे आणि नामांतर करणे हा तेथील नागरिकांच्या अस्मितेचा विषय आहे.छत्रपती संभाजी महाराजांना महत्त्व द्यायचे कि औरंगजेबाला ?, असा प्रश्‍न शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. 

वेंगुर्ला येथे २३ ते २६ जानेवारी या कालावधीत कीर्तन महोत्सव होणार

वेंगुर्ला तालुक्यातील ब्राह्मण मंडळ, युवाशक्ती प्रतिष्ठान-वेंगुर्ला आणि श्री देव रामेश्‍वर देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्याने २३ ते २६ जानेवारी या कालावधीत श्री रामेश्‍वर मंदिर येथे सायंकाळी ६ ते ९ या वेळेत कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

आर्थिक अपव्यवहाराच्या प्रकरणी दोघा चिनी नागरिकांना अटक !

भारतातील चिनी नागरिकांवर सुरक्षायंत्रणांनी किती मोठ्या प्रमाणात लक्ष ठेवणे आवश्यक आहे, हे यातून दिसून येते ! त्यामुळे चिनी नागरिकांना भारतात प्रवेश द्यायचा का, याचा सरकारने विचार करावा !

जोडवाडी (जिल्हा संभाजीनगर) येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या

निवडणुकीत हाणामारी, हत्या, पैसे वाटप, बनावट मतदान असे अनेक गुन्हे घडत असल्याने सध्याची लोकशाही निरर्थक ठरत आहे.

७१ सहस्र कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणी पुण्यातील सहकारी बँकेवर अंमलबजावणी संचालनालयाची धाड

घडणार्‍या गुन्ह्यांत राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नेते सापडण्याचे प्रमाणे अधिक असल्याने गुन्हेगारांचा भरणा असलेला पक्ष असे नाव दिल्यास त्यात चूक काय ?