वेंगुर्ला येथे २३ ते २६ जानेवारी या कालावधीत कीर्तन महोत्सव होणार

 

कीर्तन (प्रातिनिधिक छायाचित्र)

वेंगुर्ला – तालुक्यातील ब्राह्मण मंडळ, युवाशक्ती प्रतिष्ठान-वेंगुर्ला आणि श्री देव रामेश्‍वर देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्याने २३ ते २६ जानेवारी या कालावधीत श्री रामेश्‍वर मंदिर येथे सायंकाळी ६ ते ९ या वेळेत कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कीर्तन महोत्सवात पुणे येथील प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे हे प्रतिदिन सायंकाळी ६ वाजता संबोधणार आहेत. २३ जानेवारी या दिवशी ‘पाशुपतास्त्र दान’, २४ जानेवारीला ‘राजसूय यज्ञ’, २५ जानेवारीला ‘संत नामदेव महाराज’, २६ जानेवारीला ‘अफझलखान वध’ या विषयांवर ह.भ.प. आफळेबुवा कीर्तन सादर करणार आहेत. या कीर्तनांना प्रसाद मेस्त्री (तबला), अमित मेस्त्री (ऑर्गन), माधव ओगले (हार्मोनियम) आणि नीलेश पेडणेकर (पखवाज) आदी संगीतसाथ करणार आहेत. श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.