उन्हाळ्यात कृष्णा नदी कोरडी पडणार नाही, यासाठी महापालिका कोयना प्रशासनाशी समन्वय साधू ! – दिग्विजय सूर्यवंशी, महापौर

महापौर पुढे म्हणाले, ‘‘प्रत्येक उन्हाळ्यात कृष्णा नदीतील पाणी पातळी अल्प झाल्याने सांगलीकरांना पाणीटंचाईचे संकट भेडसावते. पालकमंत्र्याच्या समवेतच्या बैठकीत कृष्णेची पातळी अल्प होताच तात्काळ कोयनेतून पाणी सोडण्याचे नियोजन केले जाणार आहे.

सचिन वाझे याला पुन्हा सेवेत घेणे, ही सरकारची चूक ! – अबू आझमी

सचिन वाझे याला पुन्हा पोलीस सेवेत घेण्यास माझा विरोध होता. त्यासाठी मी शरद पवार, संजय राऊत आणि अनिल देशमुख यांना सांगितले होते; पण माझे ऐकले गेले नाही. सरकारने ही मोठी चूक केली असे वक्तव्य अबू आझमी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.

भ्रमणभाष संचावर खेळ खेळण्यावरून आई-वडील ओरडल्याने १५ वर्षांच्या मुलाची आत्महत्या

मुलांना मनुष्यजन्माचे महत्त्व आणि त्याचा शाश्‍वत आनंदासाठी कसा वापर करायचा याचे शिक्षणच दिले जात नसल्याने ते अशाश्‍वत गोष्टीमध्ये अडकून त्यासाठी स्वतःचे मौल्यवान प्राण गमावून बसत आहेत. निधर्मी राज्यव्यवस्थेचा हा पराजय आहे !

१० वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाविषयी प्रगती अहवाल सादर करण्याचा न्यायालयाचा आदेश

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अन्यत्र २५ किलोमीटरचे काम १८ घंट्यांमध्ये पूर्ण करत असेल, तर मुंबई-गोवा महामार्गाविषयीच भेदभाव का केला जात आहे ? पथकर वसुलीसाठी मात्र तत्परतेने पावले उचलली जात आहेत’, असे अधिवक्ता पेचकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

उंब्रज (जिल्हा सातारा) परिसरातील २ टोळ्यांवर सीमापारीची (तडीपारीची) कारवाई !

जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी संपूर्ण सातारा जिल्हा, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, शिराळा, वाळवा तालुक्यातून आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुका सीमेतून १ वर्षासाठी सीमापार केल्याचे आदेश दिले आहेत. बन्सल यांनी सातारा जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून १० प्रस्तावातील ४१ जणांचे सीमापारीचे आदेश दिले आहेत.

आसाममध्ये भाजपच्या उमेदवाराच्या गाडीमध्ये ई.व्ही.एम्. यंत्र आढळल्याने ४ अधिकारी निलंबित

विशेष म्हणजे गाडी भाजपचे आमदार आणि सध्याचे उमेदवार कृष्णेंदू पॉल यांची आहे, असे सांगण्यात येत आहे. यानंतर निवडणूक आयोगाने संबंधित ४ अधिकार्‍यांना निलंबित केले आहे.

दाऊदचा मुंबईतील अमली पदार्थांचा हस्तक दानीश चिकणा याला अटक

अमली पदार्थविरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दानीश याच्याकडे अमली पदार्थ सापडले आहेत.

रांगिया (आसाम) येथे अज्ञातांनी फडकवलेला पाकचा राष्ट्रध्वज स्थानिकांनी जाळला !

राज्यात विधानसभा निवडणुक चालू आहे. या पार्श्‍वभूमीवर रांगियामधील गोरुकुची भागामध्ये अज्ञातांनी रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला पाकचा राष्ट्रध्वज फडकवला.