गोवा शालांत मंडळाच्या परीक्षा प्रत्यक्ष घेऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांची म्हापसा येथे निदर्शने

 म्हापसा – गोवा शालांत मंडळाने इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करून प्रत्यक्षरित्या घेणार असल्याचे घोषित केले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर मंडळाने या परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी १७ एप्रिलला म्हापसा येथील गांधी चौकाजवळ निदर्शनाद्वारे केली. अशीच निदर्शने मडगाव येथे विद्यार्थ्यांनी १६ एप्रिलला केली होती.

परीक्षा पुढे ढकलण्याविषयी आमदार रोहन खंवटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले पत्र

सी.बी.एस्.सी’ आणि ‘आय.सी.एस्.सी.’ परीक्षांच्या धर्तीवर गोवा शालांत मंडळाच्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, असे पत्र आमदार रोहन खंवटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.