आदेशाचे उल्लंंघन करून चालू असलेल्या व्ही.एल्.सी.सी. वेलनेस अँड ब्युटी सेंटर वर पोलिसांची कारवाई !

डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडारकर रस्त्यावरील व्ही.एल्.सी.सी. अँड ब्युटी सेंटर हे सलून चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावर धाड टाकल्यावर ग्राहकांची अपॉइंटमेंट (वेळ घेऊन) तेथे सेवा चालू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

शासकीय आणि खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तात्काळ करून घेण्याचे सोलापूर जिल्हाधिकार्‍यांचे आदेश !

सुरक्षितता आणि अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असल्याविषयी त्रयस्थ ऑडिट करून घ्यावे, तसेच दोन्ही यंत्रणा सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र शहरामध्ये मनपा आयुक्त यांच्याकडे, तर ग्रामीणमध्ये उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करावे.

श्रीलंकेमध्ये चीनकडून उभारण्यात येणार्‍या ‘पोर्ट सिटी’ला श्रीलंकेतील विरोधी पक्ष, संघटना आदींकडून विरोध

श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे चीनकडून पोर्ट सिटी बनवण्याच्या विरोधात येथील सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील सर्व रुग्णालयांतील ‘ऑक्सिजन प्लान्ट’मध्ये जाण्यास बंदी !

रुग्णालयांतील ऑक्सिजन प्लान्टमध्ये कुणालाही जाण्याची अनुमती देऊ नका, असा आदेश मुंबई महापालिकेने सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालयांना दिला आहे.

ज्येष्ठ संस्कृत पंडित गुलाम दस्तगीर यांचे निधन !

ज्येष्ठ संस्कृत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांचे २२ एप्रिल या दिवशी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८७ वर्षे होते. ते मूळ अक्कलकोट तालुक्यातील आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या संस्कृत शाळेत त्यांचे शिक्षण झाले होते.

श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरात आलेल्या चिनी मालवाहू नौकेत आढळला घातक ‘युरेनियम हेक्साफ्लोराईड’ अणू पदार्थ !

श्रीलंकेकडून नौकेला तात्काळ बंदर सोडण्याचा आदेश

रायगडमधील ११ उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांतील वैद्यकीय अधीक्षकांसह अन्य रिक्त पदे भरून रुग्णांची हेळसांड थांबवावी !

‘आरोग्य साहाय्य समिती’ची रायगड जिल्हाधिकारी आणि आरोग्य सेवा उपसंचालक यांच्याकडे मागणी !

दीड लाख रुपये देऊन रुग्णाला अतीदक्षता विभागामध्ये खाट उपलब्ध !

रुग्णांकडून लाखो रुपये उकळून त्यांची फसवणूक करणार्‍या रुग्णालय प्रशासनाला याविषयी खडसवायला हवे !

नागपूर येथील परिस्थिती अधिक गंभीर; ११० कोरोनाबाधितांचा मृत्यू !

शहरात वाढत्या रुग्णसंख्येसमवेत वाढत चाललेल्या मृत्यूंमुळे परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे. प्रतिदिन मृत्यूंच्या संख्येचा आलेख वरच्या दिशेने जात आहे. मागील २४ घंट्यांत ७ सहस्र ३४४ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून ११० जणांचा मृत्यू झाला आहे.

नागपूर येथील कोरोनाबाधित कामगाराला अभिनेता सोनू सूद यांनी १५ मिनिटांत खाट उपलब्ध करून दिली !

मुंबईत बसून अभिनेता सोनू सूद यांना जे जमते, ते स्थानिक नेत्यांना का जमत नाही ?