घरांच्या छतावर मोबाइल टॉवर्स लावता येणार नाहीत ! – पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचा आदेश

निवासी क्षेत्रांमध्ये घरांच्या छतांवर भ्रमणभाष टॉवर उभारण्याची अनुमती दिली जाणार नाही.

ओटीटी मंचावरून अश्‍लील साहित्य प्रसारित होत असल्याने प्रत्येक साहित्याचे परिनिरीक्षण झाले पाहिजे ! – सर्वोच्च न्यायालय  

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकारला कळत नाही का ? गेले अनेक मास विविध संघटना अशीच मागणी करत आहेत. त्यामुळे सरकारने उशिराने का होईना याविषयी नियमावली बनवली आहे; मात्र त्यामुळे असे करणार्‍यांना कठोर शिक्षा होईल का ?

श्रीराममंदिर ७० नाही, तर १०७ एकरमध्ये उभारण्यात येणार !

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मूळ ७० एकर भूमीच्या शेजारील भूमी विकत घेतली आहे.

मदरशांमध्येही शिकवले जाणार रामायण, गीता आणि योग !

ओपन एज्यूकेशनच्या अंतर्गत विद्यार्थी याची निवड करण्यासाठी स्वतंत्र असतील. हे अनिवार्य नाही.

स्विडनमध्ये कुर्‍हाडीद्वारे करण्यात आलेल्या आक्रमणात ८ जण घायाळ : जिहादी आक्रमण असल्याची शक्यता  

आतंकवादी आक्रमण असण्याची शक्यता स्विडनचे पंतप्रधान स्टिफन लोफेन यांनी व्यक्त केली आहे.

मोदी सरकार सामान्य लोकांकडून लसीकरणासाठी पैसे का घेत आहे ? – पृथ्वीराज चव्हाण

१ मार्चपासून चालू झालेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्यात नागरिकांकडून पैसे आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

२ दिवसांत दोषींवर कारवाई करणार ! – गृहमंत्री अनिल देशमुख

जळगाव येथील आशादीप महिला वसतीगृहात तरुणींवर पोलिसांनी अत्याचार केल्याच्या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद !

एकादशी आणि चतुर्थी या तिथींना मांसविक्री न करण्याचे ठरल्यावर दुकानदारांकडून दुकाने बंद ठेवत सहकार्य !

हिंदूंच्या पवित्र तिथींना मांसविक्री बंद करण्याचा ठराव करणारे गोंदेगाव ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्य यांचे अभिनंदन ! गोंदेगावचा आदर्श अन्य गावांनीही घ्यायला हवा !

धार्मिक तेढ निर्माण करणारा हिंदुद्वेषी शरजील उस्मानी याला अटक केल्याविना रहाणार नाही ! – मुख्यमंत्री

पुणे येथे झालेल्या ‘एल्गार परिषदे’त हिंदूंचा अवमान आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा अलिगड मुस्लीम विद्यापिठातील माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याला अटक केल्याविना आम्ही रहाणार नाही. हा शरजील उस्मानी उत्तरप्रदेशमधील घाण आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय सैनिकांचा अवमान केला ! – देवेंद्र फडणवीस

ज्या भारतीय सैनिकांनी उणे तापमानात चिनी सैन्याला माघार घेण्यास भाग पाडले, त्या सैनिकांविषयी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘चीनसमोर पळ काढला’, असे बोलून सैनिकांचा अवमान केला आहे.