मुंबई – रुग्णालयांतील ऑक्सिजन प्लान्टमध्ये कुणालाही जाण्याची अनुमती देऊ नका, असा आदेश मुंबई महापालिकेने सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालयांना दिला आहे. नाशिकच्या रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या पार्श्वभूमीवर हा आदेश दिला आहे. ऑक्सिजन प्लान्टच्या भोवती १० मीटर दूरपर्यंत जाळ्या लावणे, सुरक्षारक्षकाची नेमणूक करणे, असेही या आदेशात म्हटले आहे.
‘कोविड केंद्र उभारले जात असतांनाच सुरक्षेच्या सर्व गोष्टींची काळजी घेतली आहे. खासगी रुग्णालयातील खाटांचे आणि त्या रुग्णालयाचे लेखा परीक्षण केले जात आहे’, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.