नागपूर येथील कोरोनाबाधित कामगाराला अभिनेता सोनू सूद यांनी १५ मिनिटांत खाट उपलब्ध करून दिली !

साहाय्य मागूनही राजकीय लोकांनी साहाय्य केले नाही !

मुंबईत बसून अभिनेता सोनू सूद यांना जे जमते, ते स्थानिक नेत्यांना का जमत नाही ?

नागपूर – भंडारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित असणार्‍या एका कामगाराला रुग्णालयात खाट मिळत नव्हती. त्यामुळे त्याची प्रकृती खालावत चालली होती. त्याच्या मुलाने ट्विटरच्या माध्यमातून साहाय्य करण्याचे आवाहन केले. त्या वेळी मुंबईत असणारे अभिनेता सोनू सूद यांनी ‘१५ मिनिटांत खाट मिळेल’, असे सांगून येथील मेयो रुग्णालयामध्ये कामगार रुग्णाला खाट उपलब्ध करून दिली. त्या मुलाने सोनू सूद यांचे आभार मानले.

या वेळी सोनू सूद यांनी ट्वीट करत म्हटले, ‘‘बात तो तब है जब देश मे हर जरूरतमंद को बेड मिल जाए । कोशीष जारी है । सोनू सूद ।’’ कामगाराच्या मुलाने या आधी काही राजकीय लोकांकडे साहाय्य मागितले होते; पण कुणीही साहाय्य केले नाही.