ज्येष्ठ संस्कृत पंडित गुलाम दस्तगीर यांचे निधन !

सोलापूर – ज्येष्ठ संस्कृत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांचे २२ एप्रिल या दिवशी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८७ वर्षे होते. ते मूळ अक्कलकोट तालुक्यातील आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या संस्कृत शाळेत त्यांचे शिक्षण झाले होते. पुढे त्यांनी वेदांचा अभ्यास केला आणि त्यात प्रावीण्य मिळवले. दस्तगीर यांच्या तीनही मुलांची आणि नातीच्या विवाहाची लग्नपत्रिका संस्कृतमधून छापण्यात आली होती. त्यामध्ये वेदांच्या ऋचांचा समावेश होता.