श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरात आलेल्या चिनी मालवाहू नौकेत आढळला घातक ‘युरेनियम हेक्साफ्लोराईड’ अणू पदार्थ !

श्रीलंकेकडून नौकेला तात्काळ बंदर सोडण्याचा आदेश

कोलंबो (श्रीलंका) – चीनची मालवाहू नौका श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात आली असता त्याच्यामध्ये ‘युरेनियम हेक्साफ्लोराईड’ हा अणू पदार्थ असल्याचे समोर आल्याने श्रीलंका सरकारने या नौकेला तात्काळ बंदर सोडण्याचा आदेश दिला आहे.

ही नौका चीनकडे जात असतांना त्यात बिघाड झाल्याने ती हंबनटोटा बंदरात दाखल झाली होती. या घटनेची माहिती राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांना देण्यात आली आहे.