श्रीलंकेमध्ये चीनकडून उभारण्यात येणार्‍या ‘पोर्ट सिटी’ला श्रीलंकेतील विरोधी पक्ष, संघटना आदींकडून विरोध

कोलंबो येथील चीनचा पोर्ट सीटी प्रकल्प

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेमध्ये चीनच्या विरोधात आवाज उठण्यास प्रारंभ झाला आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे चीनकडून पोर्ट सिटी बनवण्याच्या विरोधात येथील सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. विरोधी पक्ष, मजदूर संघ आदींनी या याचिका प्रविष्ट केल्या आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, या पोर्ट सिटीसाठी चीनला अमर्यादित अधिकार देण्यात आले आहेत. हे श्रीलंकेच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. सरकारने संसदेत प्रस्ताव संमत करून चीनला हे अधिकार दिले आहेत.

कोलंबो येथील बौद्धांच्या अभ्याराम मंदिराचे प्रमुख गुरु आनंद मुरूथथुवे यांनीही या पोर्ट सिटीला विरोध केला आहे. ते म्हणाले की, आम्ही श्रीलंकेला चीनची वसाहत होऊ देणार नाही. श्रीलंका सध्या चुकीच्या मार्गाने जात आहे.