सायखेडा (नाशिक) येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करणार्या पोलिसांवरच २ तरुणांचे आक्रमण
येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘गर्दी करू नका, एकत्र येऊ नका’, असे आवाहन करत असलेल्या पोलिसांवरच २ तरुणांनी आक्रमण केले. त्रिमूर्ती चौकात पोलिसांनी तरुणांच्या जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांतील अमोल कुटे आणि संतोष कुटे यांनी पोलिसांशी हुज्जत घालत त्यांना शिवीगाळ केली.