चीनमधील हुबेई येथील दळणवळण बंदी ८ एप्रिलला हटवणार

चीनच्या हुबेई प्रांतामध्ये कोरोनामुळे गेल्या ३ मासांपासून असलेली दळणवळण बंदी (लॉकडाऊन) ८ एप्रिलला उठवण्यात येणार आहे, असे चीनने घोषित केले आहे. हुबेईची राजधानी असलेल्या वुहानमध्ये दळणवळण बंदी उठवल्यावर ११ लाख लोकांना दिलासा मिळणार आहे.

सायखेडा (नाशिक) येथे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जनजागृती करणार्‍या पोलिसांवरच २ तरुणांचे आक्रमण

येथे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘गर्दी करू नका, एकत्र येऊ नका’, असे आवाहन करत असलेल्या पोलिसांवरच २ तरुणांनी आक्रमण केले. त्रिमूर्ती चौकात पोलिसांनी तरुणांच्या जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांतील अमोल कुटे आणि संतोष कुटे यांनी पोलिसांशी हुज्जत घालत त्यांना शिवीगाळ केली.

सहकार्य न करणार्‍यांवर लाठीचा उपयोग करण्यात येईल ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

संचारबंदीला ९० टक्के जनतेचे सहकार्य मिळाले आहे; मात्र काही लोकांना परिस्थितीचे गांभीर्य नाही. जे सहकार्य करणार नाहीत, त्यांच्यावर लाठीचा उपयोग करण्यात येईल, अशी चेतावणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

मुसलमानांनी दळणवळण टाळून घरातच नमाजपठण करावे !

सध्याची स्थिती पहाता मशिदीमध्ये केवळ ४-५ जणांनीच जाऊन नमाजपठण करावे, तर उर्वरित मुसलमानांनी घरामध्येच नमाजपठण करावे, असे आवाहन बिहारमधील मुसलमानांच्या काही धार्मिक संघटनांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक येथे वाहनांना मर्यादित इंधन

नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि कोरोनाचा संसर्ग वाढू नये, या हेतूंनी येथील जिल्हाधिकार्‍यांनी इंधन पुरवठ्यावर निर्बंध आणले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने खासगी वाहने वापरणार्‍यांची संख्या अधिक आहे.

महिला पोलिसाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की करणारे फकिर महंमद हुसेन नेवरेकर यांच्यावर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

खासगी वाहनांच्या बंदी आदेशाविषयी माहिती देणार्‍या एका महिला पोलीस कर्मचार्‍याशी धक्काबुक्की करून त्यांना खाली पाडल्याची घटना लांजा येथे घडली.

यवतमाळ जिल्ह्यात २ दिवसांत ३८ जणांवर फौजदारी गुन्हा नोंद

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचे उल्लंघन करणार्‍या ३८ जणांवर २२ आणि २३ मार्च या दिवसांमध्ये फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आला. विनाकारण फिरणार्‍यांना पोलिसांकडून चोप दिला जात आहे.

कोरोना विषाणू हवेत ३ घंट्यांपर्यंत जिवंत राहू शकतो ! – संशोधन

कोरोना विषाणू हवेत ३ घंट्यांपर्यंत जिवंत राहू शकतो, असे न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनातून समोर आले आहे.

उत्तरप्रदेशमध्ये विदेशी पर्यटक रस्त्यावर फिरतांना आढळल्यास त्यांचे पारपत्र घेतले जाणार कह्यात !

येथे राज्य सरकारने दळणवळणबंदी घोषित केलेली असतांना काही विदेशी नागरिकांकडून या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कौशल किशोर शर्मा यांनी विदेशी पर्यटकांसाठी एक कठोर निर्णय लागू केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकत असतांनाही युरोप आणि अमेरिका येथील जनता करत होती मौजमजा !

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यावर त्याची तीव्रता लक्षात येत आहे. चीनमध्ये याचा प्रादुर्भाव होत असतांना अनेक देश त्याकडे गांभीर्याने पहात नव्हते. युरोपमधील इटली, स्पेन, फ्रान्स, ब्रिटन, तसेच अमेरिका येथे जनता त्याकडे गांभीर्याने न पहाता मौजमजा करत होती; मात्र आता तेथील स्थिती अत्यंत वाईट…