भारतीय रेल्‍वेची तिकीट विक्री काही घंटे बंद

आय.आर्.सी.टी.सी. (इंडियन रेल्‍वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) चे ‘अ‍ॅप’ आणि संकेतस्‍थळ बंद पडले होते. त्‍यामुळे तिकीट काढणार्‍या प्रवाशांची गैरसोय झाली.

(म्हणे) ‘संरक्षणाचा सौदा करणार्‍यांसाठी देश पहिला कि वासना ?’ – असदुद्दीन ओवैसी

भारताच्या संरक्षणाला सुरुंग लावणार्‍यांच्या विरोधात भारत सरकार कटीबद्धच आहे ! मुसलमानांसाठी देश पहिला आहे कि नाही ? यावर ओवैसी पळपुटी भूमिका घेतात, हे मात्र खरे !

(म्हणे) ‘पाकने भीक मागणे बंद करावे !’ – पाकचे सैन्यप्रमुख

पाकिस्तानचे आर्थिक दिवाळे निघाले आहे. त्यामुळे पाकच्या सैन्यप्रमुखांनी अशी कितीही वक्तव्ये केली, तरी तेथील परिस्थिती पालटणार नाही, हेही तितकेच खरे !

पाकच्या इस्लामिया विद्यापिठातील शेकडो विद्यार्थिनींचे ५ सहस्र ५०० अश्‍लील व्हिडिओ आले समोर !

एजाज शाह याच्या दोन भ्रमणभाषांतून शेकडो मुलींचे ५ सहस्र ५०० अश्‍लील व्हिडिओ प्राप्त झाले असून त्याच्या गाडीतून ‘आइस ड्रग’ नावाचा अमली पदार्थही मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आला.

भारताने चीनच्या इलेक्ट्रिक चारचाकी आस्थापनाच्या गुंतवणुकीला दिला नकार !

बीवायडी हे आस्थापन सध्या तिची २ इलेक्ट्रिक वाहने भारतात विकत आहे, तसेच इलेक्ट्रिक बसच्या संदर्भात भारतातील ओलेक्ट्रा ग्रीनटेक या आस्थापनाला तांत्रिक साहाय्य करत आहे.

श्रीलंकेच्या नौदलाकडून ९ भारतीय मासेमारांना अटक

श्रीलंकेच्या नौदलाने त्याच्या समुद्री क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्रवेश करून मासेमारी केल्याच्या प्रकरणी ९ भारतीय मासेमारांना अटक केलीे. या वेळी श्रीलंकेच्या नौदलाने या मासेमारांच्या २ नौकाही कह्यात घेतल्या.

पाकमध्ये गेलेल्या राजस्थानमधील विवाहित ख्रिस्ती धर्मीय अंजू हिने केला प्रियकर नसरूद्दीनशी विवाह !

राजस्थानमधील भिवाडी येथे रहाणारी अंजू नावाची विवाहित ख्रिस्ती महिला पाकिस्तानात तिच्या प्रियकराकडे गेल्याचे समोर आल्यानंतर आता तिने तेथे तिचा प्रियकर नसरूद्दीन याच्याशी न्यायालयाच्या माध्यमातून विवाह केला आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी

कर्नाटक उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींना ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी ‘व्हॉट्स अ‍ॅप’द्वारे देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौकशी चालू केली आहे.

मेघालयच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर जमावाचे आक्रमण : ५ सुरक्षा कर्मचारी घायाळ

जेथे मुख्यमंत्र्यांचेच कार्यालय सुरक्षित नाही, तेथे जनता कशी सुरक्षित असेल ?

ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाच्या विरोधात मुसलमान पक्षाकडून अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीने उच्च न्यायालयात न जाता थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यावर न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा आदेश दिला होता.