तुरा (मेघालय) – मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या कार्यालयावर जवामाने केलेल्या आक्रमणात ५ सुरक्षा कर्मचारी घायाळ झाले. येथे आता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या आक्रमणाच्या वेळी मुख्यमंत्री संगमा एका शिष्टमंडळाशी चर्चा करत होते. चर्चा संपली असता कार्यालयाबाहेर अचानक जमाव आला आणि दगडफेक करू लागला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. जमावाने मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रवेशद्वार तोडण्याचाही प्रयत्न केला.
सौजन्य झी न्यूज इंग्लिश
मुख्यमंत्री संगमा म्हणाले की, कार्यालयावर झालेले आक्रमण अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही ‘अचिक कॉन्शियस होलिस्टिकली इंटिग्रेटेड क्रिमा’ आणि ‘गारो हिल्स स्टेट मूव्हमेंट कमिटी’ यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत आहोत. त्यांच्या काही मागण्या आहेत. आक्रमण करणारे कोण आहेत ?, हे या संघटनांच्या प्रतिनिधींनाही ठाऊक नाही. हे बाहेरचे लोक होते. त्यांचा शोध घेतला जात आहे.
संपादकीय भूमिकाजेथे मुख्यमंत्र्यांचेच कार्यालय सुरक्षित नाही, तेथे जनता कशी सुरक्षित असेल ? |