सर्व वाहनांना पथकरातून सवलत मिळणे अशक्य ! – भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण

केंद्रशासनाच्या नियमानुसार टोल नाक्यावर सरसकट सर्व वाहनांना पथकरातून सूट देण्याचे प्रावधान नाही. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओसरगाव पथकर नाक्यावर जिल्ह्यातील सर्व वाहनांना पथकरातून सूट देणे नियमानुसार शक्य नाही.

गोव्यात कह्यात घेतलेले २५ किलो अमली पदार्थ आज नष्ट केले जाणार

संपूर्ण देशभरात आज नष्ट करण्यात येणार्‍या अमली पदार्थांची संख्या पकडल्यास १ जून २०२२ पासून आतापर्यंत अमली पदार्थ नष्ट केल्याची संख्या १० लाख किलोवर (किंमत सुमारे १२ सहस्र कोटी रुपये) पोचणार आहे !

पुणेकरांनो, शाडू आणि चिकण मातीच्‍या श्री गणेशमूर्ती खरेदी करा ! – डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्‍त आयुक्‍त, पुणे

पुणेकर नागरिकांनो, शाडू माती, चिकण माती अशा नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्‍या श्री गणेशमूर्ती खरेदीस प्राधान्‍य द्यावे.

पुण्‍यात आढळले डेंग्‍यूचे ६६ संशयित रुग्‍ण; १२ जणांना डेंग्‍यूचे निदान !

महापालिका हद्दीत यंदा जानेवारी ते जून या कालावधीत डेंग्‍यूचे ४७२ संशयित रुग्‍ण आढळले होते. याच कालावधीत डेंग्‍यूचे निदान झालेले २१ रुग्‍ण आढळले होते आणि ते सर्व जानेवारी ते मार्च या कालावधीत सापडले होते.

बँडस्‍टँड (वांद्रे) येथे व्‍हिडिओ काढतांना समुद्रात बुडून पत्नीचा मृत्‍यू !

मागून समुद्राच्‍या मोठमोठ्या लाटा येत होत्‍या. त्‍या वेळी मुलाने आई-वडिलांना बजावलेही; पण त्‍यांनी ऐकले नाही. तितक्‍यात एक मोठी लाट आल्‍याने दांपत्‍य समुद्रात पडले. पती मुकेश सोनार याला लोकांनी वाचवले; पण पत्नी ज्‍योती सोनार (वय ३२ वर्षे) हिला वाचवता आले नाही.

प्राथमिक अपेक्षा पूर्ण करण्‍यातच कलंकित सरकार अपयशी ठरले आहे ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता, विधान परिषद

चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्‍कार घातला आहे, असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी १६ जुलै या दिवशी विधानभवनात आयोजित केलेल्‍या पत्रकार परिषदेत केला.

टोलनाक्‍यावरील कर्मचार्‍याला ट्रकचालकाने १२ कि.मी. फरफटत नेले !

पथकर नाक्‍यावरील कर्मचार्‍याला फरफटत नेणे हे कायदा-सुव्‍यवस्‍थेचा धाक नसल्‍याचे उदाहरण !

पुण्‍यातील १ सहस्र ३८५ ग्रामपंचायतींमध्‍ये मोठ्या प्रमाणात निधी शिल्लक !

संमत निधीचा विकासकामांसाठी वापर होत नसेल, तर निधी का घेण्‍यात येत आहे ? यासाठी संबंधितांची चौकशी करून कारवाई करणे आवश्‍यक आहे.

मालाड (मुंबई) येथील मार्वे समुद्रात ५ मुले बुडाली !

यापैकी २ मुलांना वाचवण्‍यात आले असून ३ मुले बेपत्ता आहेत. त्‍यांचा युद्धपातळीवर शोध चालू आहे. ही सर्व मुले १२ ते १६ वर्षे वयोगटातील होती.

गायीच्‍या दुधाला प्रतिलिटर किमान ३४ रुपयांचा दर !

गायीच्‍या दुधाला प्रतिलिटर किमान ३४ रुपयांचा दर देण्‍यात येणार आहे, असा निर्णय घेण्‍यात आल्‍याची माहिती दुग्‍धविकासमंत्री राधाकृष्‍ण विखे-पाटील यांनी दिली. दुधाला किमान भाव मिळावा, दुधाच्‍या खरेदी दरात कपात होऊन दूध उत्‍पादक शेतकर्‍यांची आर्थिक हानी होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेतल्‍याचे त्‍यांनी सांगितले.