पुणे पोलिसांकडून अन्वेषण काढून अन्य पोलिसांकडे द्यावे ! – चित्रा वाघ, महिला प्रदेशाध्यक्षा, भाजप

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण

मराठीचा प्रचार आणि प्रसार करणार्‍या मुंबईतील अमेरिकन महावाणिज्यदूतांचा गौरव

आरोग्य, शिक्षण क्षेत्रात समाजमाध्यमांद्वारे विविध उपक्रम राबवून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणार्‍या मुंबईतील अमेरिकन महावाणिज्यदूत कार्यालयामधील प्रतिनिधींचा मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

वरळी येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सदनिका लाटल्याचा गंभीर आरोप, न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी योजनेच्या लाभार्थी नसतांना वरळी येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील ६ हून अधिक सदनिका लाटल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

खासदार मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस चौकशी करणार ! – गृहमंत्री

अनिल देशमुख यांनी सांगितले की, डेलकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी अनेकांची नावे आत्महत्या पत्रामध्ये लिहिली आहेत. भाजपचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर केंद्राचा दबाव होता का ? या सर्व त्रासामुळे डेलकर यांनी आत्महत्या केली का ? याची पडताळणी केली जाईल, दोषींवर कडक कारवाई केली जाईल.

महाशिवरात्रीच्या काळात भावाच्या स्तरावर साधना करून शिवाची कृपा संपादन करूया ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रसारक, सनातन संस्था

महाशिवरात्रीच्या औचित्याने पश्‍चिम महाराष्ट्र आणि गोवा येथील साधकांसाठी ‘ऑनलाईन महाशिवरात्री शिबिर’

मुंबईमध्ये आढळणार्‍या ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत !- इकबाल चहल, आयुक्त, मुंबई महानगरपालिका

२४ फेब्रुवारी या दिवशी मुंबईमध्ये कोरोनाचे १ सहस्र १६७ रुग्ण आढळले आहेत; मात्र त्यांतील ८३ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी दिली.

बंगालच्या मंत्र्यांवरील बॉम्ब आक्रमणाच्या प्रकरणी बांगलादेशी नागरिकाला अटक

ममता बॅनर्जी यांनी ज्यांना त्यांच्या १० वर्षांच्या सत्तेच्या काळात डोक्यावर बसवले, त्याच लोकांनी सरकारमधील मंत्र्यांवर आक्रमण केले.

कोल्हापूर येथे २७ फेब्रुवारी या दिवशी अखंड श्रीराम नामजपाचे आयोजन !

सद्गुरु कृपेने २७ फेब्रुवारी या दिवशी पौर्णिमेच्या निमित्ताने पहाटे ५ ते सायंकाळी ६ या वेळेत १३ घंटे ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या नामजप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार !

येथील सुखसागर परिसरात एकाच रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे २ स्वतंत्र कार्यादेश (वर्कऑर्डर) २ वेगवेगळ्या ठेकेदारांना महापालिका प्रशासनाने दिले. प्रत्यक्ष काम चालू करतांना हा प्रकार लक्षात आल्याने महापालिकेच्या अजब आणि मनमानी कारभाराची चर्चा होत आहे.

श्री सिद्धेश्‍वर देवस्थानचे पंच डॉ. शे.दे. पसारकर (वय ६८ वर्षे) यांचे निधन

श्री सिद्धेश्‍वर देवस्थानचे पंच, तसेच प्रख्यात वीरशैव मराठी साहित्यिक अन् संगमेश्‍वर महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक डॉ. शे.दे. पसारकर (वय ६८ वर्षे) यांचे २४ फेब्रुवारीच्या रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, २ मुली, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.