गीता प्रेस ट्रस्टचे अध्यक्ष आणि ‘कल्याण’ नियतकालिकाचे संपादक राधेश्याम खेमका यांचे निधन 

राधेश्याम खेमका

गोरखपूर (उत्तरप्रदेश) – येथील गीता प्रेस ट्रस्टचे अध्यक्ष आणि ‘कल्याण’ या नियतकालिकाचे संपादक राधेश्याम खेमका यांचे वाराणसी येथे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. खेमका यांच्या निधनाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

खेमका गेली ३८ वर्षे या नियतकालिकाचे संपादक होते. या काळात त्यांनी ३८ वार्षिक विशेषांक आणि ४६० अंकांचे संपादन केले. आजारी असतांनाही त्यांनी यावर्षीही अंकांचे संपादन केले. या ३८ वर्षांत ९ कोटी ५४ लाख ४६ सहस्र प्रती प्रकाशित करण्यात आल्या. ‘कल्याण’ नियतकालिकातून हिंदूंच्या पुराण आणि अन्य धार्मिक ग्रंथांमधील माहिती प्रसिद्ध करण्यात येत होती.