क्रांतीकारक राजगुरु यांचे लवकरच पुणे येथे भव्‍य स्‍मारक होणार !

सांस्‍कृतिक विभागाकडून या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांसह पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री, स्‍थानिक लोकप्रतिनिधी, पुरातत्‍व विभागाचे अधिकारी, आराखडा समितीचे सदस्‍य यांना निमंत्रित करण्‍यात आले आहे.

संस्‍थानविरोधात चुकीची माहिती देणार्‍यांवर साई संस्‍थान कारवाई करणार !

तेलंगाणा राज्‍यातही अशा प्रकारे चुकीचा संदेश प्रसारित झाल्‍याची तक्रार साईभक्‍तांनी केली आहे. त्‍याअन्‍वये शिर्डी पोलीस ठाण्‍यात भारतीय दंड विधान कलम २९५, १५३ ए आणि ५०० अंतर्गत गुन्‍हा नोंद करण्‍यात आला असून शिर्डी पोलीस अधिक अन्‍वेषण करत आहेत.

विद्याविहार येथे दुमजली बंगला ८ ते १० फूट खचला !

अग्‍निशमन दल, एन्‌डीआरएफ, पोलीस आणि पालिका अधिकारी यांनी दोघांना बाहेर काढले; मात्र दोघेजण आतच अडकून होते.

नवी मुंबई येथील ज्ञानपुष्‍प विद्यालयाला महापालिकेच्‍या शिक्षणाधिकार्‍यांकडून नोटीस !

एस्.एस्.सी.बोर्डाचे वर्ग बंद करून सी.बी.एस्.ई. बोर्डाचे वर्ग चालू केल्‍याच्‍या प्रकरणी सीबीडी येथील ज्ञानपुष्‍प विद्यालयाला नवी मुंबई महापालिकेच्‍या शिक्षण अधिकारी अरुणा यादव यांनी नोटीस बजावली आहे. शिक्षण उपसंचालक आणि बाल हक्‍क आयोग यांनाही नोटीसीची प्रत माहितीस्‍तव पाठवण्‍यात आली आहे. 

कोल्‍हापूरमध्‍ये ‘सद़्‍भावना रॅली’च्‍या नावाखाली कायदा-सुव्‍यवस्‍था बिघडवण्‍याचा डाव !

मुख्‍यमंत्र्यांच्‍या नावे असलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे की, गेल्‍या दोन मासांपासून धर्मांधांकडून जाणीवपूर्वक होत असलेल्‍या घटनांमुळेच ७ जून या दिवशी हिंदूंचा उद्रेक झाला. त्‍यामुळे ही शांतता बिघडवण्‍याचे काम कोण करत आहे ? याचे अन्‍वेषण अगोदर झाले पाहिजे. औरंगजेबाचे ‘स्‍टेटस’ ठेवण्‍यामागील मुख्‍य सूत्रधार कोण आहे ? याचे विशेष पोलीस पथकाद्वारे अन्‍वेषण केले जावे.

पुण्‍याचे अतिरिक्‍त आयुक्‍त अनिल रामोड निलंबित !

विभागीय आयुक्‍तालयातील अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ. अनिल रामोड यांना सेवेत ठेवले, तर अन्‍वेषणात अडथळे निर्माण होतील. त्‍यामुळे त्‍यांना निलंबित करावे, असे पत्र केंद्रीय गुन्‍हे अन्‍वेषण विभागाने विभागीय आयुक्‍त कार्यालयाला दिले होते.

लातूर येथील १६ कृषी केंद्रांवर कारवाई !

कृषी विभागाने केलेल्‍या नियमांचे पालन न करणार्‍या २ कृषी केंद्राचे परवाने कायमस्‍वरूपी रहित करण्‍यात आले असून १४ केंद्राचे परवाने निलंबित करण्‍यात आले आहेत. येथील कृषी विभागाने ही कारवाई केली आहे.

इगतपुरी (जिल्‍हा नाशिक) येथे गोमांस तस्‍करीच्‍या संशयातून जमावाच्‍या मारहाणीत एकाचा मृत्‍यू, तर एक घायाळ !

जिल्‍ह्यातील इगतपुरी येथील सिन्‍नर घोटी मार्गावर गंभीरवाडीजवळ २ जणांना गोमांस घेऊन जाण्‍याच्‍या संशयातून अज्ञात १०-१५ जणांकडून मारहाण करण्‍यात आली आहे

सांगली येथील अवैध पशूवधगृहावर धाड !

गणेशनगर भागात गोवंशियांची अवैध रितीने कत्तल होत असल्‍याच्‍या संशयावरून महापालिकेचे आरोग्‍य अधिकारी, पोलीस प्रशासन, पशूवैद्यकीय अधिकारी यांनी गणेशनगर येथे चालणार्‍या एका अवैध पशूवधगृहावर धाड टाकली.

तांदूळाच्‍या वाटपामध्‍ये केंद्र सरकार राजकारण करत आहे ! – सिद्धरामय्‍या, मुख्‍यमंत्री, कर्नाटक

‘भ्रष्‍टाचार म्‍हणजे शिष्‍टाचार ’ हे घोषवाक्‍य देऊन इंदिरा गांधींनी ते अमलात आणले. असे नेते असणार्‍या काँग्रेसच्‍या नेत्‍यांना हे बोलण्‍याचा अधिकार काय ?