सांगली येथील अवैध पशूवधगृहावर धाड !

प्रतिकात्मक चित्र

सांगली – गणेशनगर भागात गोवंशियांची अवैध रितीने कत्तल होत असल्‍याच्‍या संशयावरून महापालिकेचे आरोग्‍य अधिकारी, पोलीस प्रशासन, पशूवैद्यकीय अधिकारी यांनी गणेशनगर येथे चालणार्‍या एका अवैध पशूवधगृहावर धाड टाकली. या वेळी तेथे मिळालेले गोवंशियांचे अवशेष पशूवैद्यकीय विभागाने कह्यात घेतले. हे अवशेष प्रयोगशाळेत पडताळणीसाठी पाठवण्‍यात आले आहेत.

या प्रसंगी मानद पशूकल्‍याण अधिकारी श्री. नितेश ओझा, अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे श्री. अंकुश गोडेसे यांसह सर्वश्री कृष्‍णा यादव, प्रताप बानकर, प्रथमेश सरगर, अभिजित रामचंद्रे, राहुल बोळाज, अभिमन्‍यू भोसले यांसह अन्‍य उपस्‍थित होते. ‘येथे गोवंशांची अवैध रितीने कत्तल केली जाते’, असा आरोप गोरक्षकांनी केला आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्‍हा नोंद  झाला आहे.