मुंबईत देशी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगणार्‍या दोघांना अटक !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – दोन विविध कारवायांमध्ये दोघांना घातक शस्त्रांसह मालाड आणि विलेपार्ले येथून स्थानिक पोलिसांनी अटक केली. पूजा संदीप लोंढे उपाख्य नगमा हनीफ शेख आणि महेश रामलखन गुप्ता उपाख्य मटरू अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन देशी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अटकेनंतर दोघांनाही स्थानिक न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.