सोलापूर येथे १ मे या दिवशी नवीन न्यायालयाच्या इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम !

जिल्हा न्यायालयाची सध्याची इमारत न्यायालयीन कामकाजासाठी अपुरी पडत असल्याने नव्या इमारतीच्या बांधकामाचा पायाभरणी समारंभ येत्या १ मे या दिवशी होणार आहे.

नाशिकरस्ता येथे मधमाशांचा ७० नागरिकांना चावा !

येथील जुने न्यायालय परिसरातील पिंपळाच्या झाडावर अनेक वर्षांपासून मधमाशांचे पोळे आहे. २३ एप्रिल या दिवशी सायंकाळी अचानक सर्व मधमाशांनी पोळ्यावरून उठत परिसरातील ७० ते ८० नागरिकांवर आक्रमण करत त्यांचा चावा घेतला.

‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून भांडी धुण्यासाठी अत्याधुनिक यंत्र स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट !

‘श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा’स ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून ‘सी.एस्.आर्.’ (सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी देण्यात येणारा निधी) निधीतून ताट, वाट्या धुण्यासाठी अत्याधुनिक यंत्र (डिश वॉशर मशीन) अन्नछत्र मंडळाला भेट देण्यात आले.

नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप खैरे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीचा अर्ज घेतला !

नाशिक लोकसभा जागावाटपात मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेचा अर्ज मागे घेतल्यानंतर विविध घडामोडी घडत आहेत.

नंदुरबार येथे लाचखोर प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्याविरुद्ध जमाव संतप्त !

असे पोलीस जनतेचे रक्षक नसून भक्षकच आहेत, असे म्हटल्यास त्यात चूक काय ?

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने जलसंपदा विभागाचे थकवले ४० कोटी रुपये !

कोट्यवधी रुपयांची थकबाकी करणारी महापालिका जिल्ह्याचा कारभार कशी करत असेल ? संबंधित अधिकार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

नगरमध्ये २७ ते २९ एप्रिल या कालावधीत गीतेवर प्रवचनमालिका !

येथील ‘ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण मंडळा’च्या वतीने शनिवार, २७ ते सोमवार, २९ एप्रिल २०२४ या कालावधीत रासनेनगरमधील श्रीदुर्गामाता मंदिराच्या सभागृहात सायंकाळी ६ ते रात्री ७ या वेळेत श्रीमद्भगवद्गीतेवरील प्रवचनमालिकेचे आयोजन करण्यात आले आहे

रत्नागिरीत महायुतीचे उमेदवार मंत्री नारायण राणे यांनी घेतली विविध संघटना, व्यावसायिक, उद्योजक यांची भेट

भेटींमध्ये औद्योगिक क्षेत्रातील गद्रे मरीनचे दीपक गद्रे, जागृत मोटर्सच्या रेश्मा जोशी, प्रसिद्ध अधिवक्ता प्रदीप नेने यांच्यासमवेत चर्चा करण्यात आली.

देशाला सुरक्षित आणि विकसित कोण करू शकतो ? याचा विचार करायला लावणारी ही निवडणूक ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज तरुणांना देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आहे. वर्ष २०२६ नंतर हा अर्धा मंच महिलांचा असेल. समाजाच्या प्रत्येक घटकाला घेऊन मोदीजी पुढे चालले आहेत.

शिक्षणक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल गौरव !

वर्ष २००९ मध्ये ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे यांची संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर संस्थेचे शैक्षणिक कार्य गतीमान झाले.