घरफोडीच्या प्रयत्नातील अटकेतील संशयित केरामसिंह मेहडा याचे मिरज शासकीय रुग्णालयातून पलायन

घरफोडीच्या प्रयत्नातील अटकेतील संशयित केरामसिंह मेहडा याने ४ जानेवारी या दिवशी सकाळी ६.३० वाजता मिरज शासकीय रुग्णालयातील स्नानगृहातून पलायन केले आहे.

कणकवलीत मुंबई-गोवा महामार्गाचे काम चालू असलेल्या ठिकाणचा संरक्षक पत्रा कोसळून दुचाकीस्वार घायाळ 

मुंबई-गोवा महामार्गावर पूलाचे काम चालू असतांना पटवर्धन चौकात बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या खाली लावलेले संरक्षक पत्रे पडून एक दुचाकीस्वार युवक घायाळ झाला.

सांगली-कोल्हापुरात दिवसभर ढगाळ वातावरण : सायंकाळी कोल्हापुरात पाऊस

४ जानेवारीला सांगली-कोल्हापुरात ढगाळ वातावरण राहिले. सायंकाळी कोल्हापुरात जोरात पाऊस आला. ५ जानेवारीलाही हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

कणकवली बाजारपेठेतील दोन दुकाने जळून खाक

बाजारपेठेतील झेंडाचौक येथे ४ जानेवारीला पहाटे लागलेल्या भीषण आगीत ‘जयभारत कोल्ड्रिंक्स हाऊस’ अन् ‘रामचंद्र उचले किराणा आणि आयुर्वेदिक दुकान’ ही दोन दुकाने जळून खाक झाली.

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपचा ७ जानेवारीला कणकवलीत ट्रॅक्टर मोर्चा

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ ७ जानेवारीला कणकवली शहरातील भाजप कार्यालय ते प्रांत कार्यालयापर्यंत भाजपच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे.

‘शिवशाही’ वातानुकूलित शयनयान सेवा एस्.टी. महामंडळाकडून बंद

एस्.टी. महामंडळाला सातत्याने होत असलेल्या तोट्यामागे कुणाचे आर्थिक लागेबांधे आहेत का ?, तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यय करून केवळ अडीच वर्षांत ही सेवा बंद करण्याची वेळ का आली ? याचे चिंतनही एस्.टी. महामंडळाने करावे.

सोलापूर येथील शाळकरी मुलांकडून १० दुचाकी वाहने जप्त

येथील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या ‘डीबी’ (डिटेक्टिव्ह ब्रँच) पथकाने १२ वर्षांच्या शाळकरी मुलांकडून १० दुचाकी वाहने जप्त केली. ही मुले शहरातील झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास होती.

पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्‍वारूढ पुतळा सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात  

शिवाजी चौक येथील सर्वांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभिकरण पूर्ण होत आहे.

ब्रिटनमधील नवीन प्रकाराच्या कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात शिरकाव, ८ रुग्ण आढळले

मुंबईतील ५, तर पुणे, ठाणे आणि मीरा-भाईंदर येथील प्रत्येकी एक रुग्ण यांच्यात या कोरोनाच्या विषाणूची लक्षणे आढळली आहेत.