उच्च शिक्षण विभागाची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठास नोटीस

महाराष्ट्र शासनाची अनुमती न घेता विद्यापिठाने त्यांच्या अंतर्गत येणार्‍या महाविद्यालयामध्ये पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग ११ जानेवारीपासून चालू करण्याचा निर्णय घेतला असल्याने उच्च शिक्षण विभागाने विद्यापिठास फटकारले आहे.

भिवंडी येथील खासगी जागेवरील अतिक्रमण हटवले

अतिक्रमण आणि कचर्‍याची दुर्गंधी यांमुळे शिवाजीनगर भागातील नागरिक त्रस्त झाले होते. नगरसेविका सौ. सायली गजानन शेटे यांच्या पुढाकाराने जेसीबी यंत्राच्या साहाय्याने येथील खासगी जागेवरील अतिक्रमण आणि कचरा हटवण्यात आला.

भंडारा प्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली जाईल ! – उद्धव ठाकरे

‘‘या वेळी माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते. केवळ या कुटुंबांसमोर मी हात जोडून उभा होतो. या घटनेच्या मुळापर्यंत जाण्यासाठी चौकशी समिती चौकशी करत आहे. एका मासात या समितीचा अहवाल येईल, दोषींवर कडक कारवाई केली जाईल.’’

भारतात प्रसारित होणार्‍या हिंदी चित्रपटांमध्ये उर्दू आणि इंग्रजी मिश्रित हिंदीचा वापर !

हिंदी चित्रपटांद्वारे हिंदीवर उर्दू आणि इंग्रजी भाषांचे होणारे आक्रमण गंभीर आहे. याचा प्रभाव समाजावर होतो ! त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांनी हिंदीच्या शुद्धीसाठी शालेय स्तरावरून, तसेच मनोरंजन आदी क्षेत्रांतूनही प्रयत्न केले पाहिजेत !

औरंगाबादच्या नामांतराची भूमिका शिवसेनेची, सरकारची नाही ! – प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विचार करून नव्हे; तर मुसलमानांच्या लांगूलचालनावरून त्यांची भूमिका ठरवणारे राजकीय पक्ष !

मुंबईमध्ये ‘अँटिबॉडीज्’ रोखू न शकणारा कोरोनाचा नवा विषाणू आढळल्याविषयी तज्ञांमध्ये मतमतांतरे

मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये मानवी शरिरातील प्रतिपिंडांना (अँटिबॉडीज्) भारी पडणारा कोरोनाचा नवा विषाणू आढळला आहे. मुंबई उपनगरातील खारघर येथील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये हा विषाणू आढळला आहे.

भंडारा येथील आगीच्या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश

भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला ८ जानेवारीच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

हत्या करण्यासाठी गोवंशीय आणि अन्य जनावरे बाळगल्याप्रकरणी १८ धर्मांधांवर गुन्हा नोंद

गुन्हेगार धर्मांधांवर कठोर कारवाई केल्यासच गोहत्या रोखण्यात यश येऊ शकते, त्यामुळे या प्रकरणाचे सखोल अन्वेषण होऊन आरोपींवर वरवर कारवाई न करता कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !

तंबाखूजन्य वस्तूंची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी वैभववाडी पोलिसांकडून खाजगी बसचालकावर कारवाई

खाजगी बसमधून तंबाखूजन्य वस्तूंची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी चालक इंदरसिंह हिरालालजी गुजर (वय ४५ वर्षे) आणि वाहक भैरू शंभूनाथ (वय ४३ वर्षे) या दोघांना वैभववाडी पोलिसांनी कह्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदवला.

गायी-म्हशी दिल्या असत्या, तर सर्वसामान्य शेतकरी सक्षम झाला असता ! – आमदार दीपक केसरकर

काही राजकीय पक्षांनी गाड्या दिल्या; मात्र शेतकर्‍यांना गायी-म्हशी दिल्या असत्या, तर सर्वसामान्य शेतकरी सक्षम झाला असता. आम्ही नाहक रोजगार आणि विकास यांचे आमिष दाखवून कुणाला फसवले नाही. असे प्रतिपादन माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी माडखोल येथे केले.