इतिहासात प्रथमच नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या खंडेरायाची यात्रा रहित

दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेली नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडेरायाची यात्रा कोरोनामुळे इतिहासात प्रथमच रहित करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त जिल्हा प्रशासनाकडून व्यापार्‍यांना प्रदर्शन न लावण्याचे आदेश दिले आहेत.

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी ‘ऑनलाईन पास’ची सक्ती रहित

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चालू करण्यात आलेल्या ‘ऑनलाईन पास’ची सक्ती रहित करण्यात आली असून आता ‘पास’विना श्री विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे.

निधन वार्ता 

सनातनच्या साधिका सौ. संगिता मर्दा यांचे वडील बद्रीनारायण शंकरलाल करवा (वय ८४ वर्षे) यांचे १० जानेवारी या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, २ मुले, १ सून, २ मुली, २ जावई आणि नातवंडे, असा परिवार आहे.

अवैध धंद्यांशी निगडित असलेल्या उमेदवाराला मतदारांनी नाकारावे !

‘अवैध मार्गाने मिळवलेल्या पैशांचा वापर करून निवडणुका जिंकून अवैध धंदे राजरोसपणे चालवण्याची त्यांना अनुमती मिळणार नाही’, याची दक्षता ग्रामस्थांनी घ्यायची आहे, असे ‘कोकण लाईव्ह ब्रेकिंग’ने म्हटले आहे.

दिवसाला ६०० जणांचे लसीकरण करणार – पालकमंत्री

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या फेरीमध्ये जिल्ह्यातील ९ सहस्र ४३४ आधुनिक वैद्य, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे.

शिवकालीन मर्दानी कला अवगत करणे, ही काळाची आवश्यकता !  – अमोल बुचडे प्रशिक्षक शिवशाहू मर्दानी आखाडा, कोल्हापूर

शिवकालीन कलेचे जतन व्हावे आणि महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी शिवकालीन मर्दानी कला अवगत करणे काळाची आवश्यक आहे, असे मत कोल्हापूर येथील शिवशाहू मर्दानी आखाड्याचे प्रशिक्षक अमोल बुचडे यांनी केले.

राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

१२ ते १६ जानेवारीपर्यंत प्रतिदिन भजन, कीर्तन, प्रवचन, हळदी-कुंकू, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहातील समस्यांविषयी महापालिका आयुक्तांना निवेदन

मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहाच्या विविध समस्यांविषयी इंद्रधनू कलाविष्कार संस्था मिरज यांच्या वतीने ११ जानेवारी या दिवशी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना निवेदन देण्यात आले.

बालगंधर्व नाट्यगृहाच्या सुधारणेविषयी रंगकर्मींचे मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन 

मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहाच्या सुधारणेविषयी रंगकर्मीनी ९ जानेवारी या दिवशी नगरविकासमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. नाट्यगृहात कलाकार, नाट्यकर्मी, प्रेक्षक यांना आवश्यक असलेल्या सुविधांचा अभाव आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यासह कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यातील ७४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी कारवाई करून अवैध मद्यविक्री केल्याप्रकरणी २७८ गुन्हे नोंद केले आहेत. त्यामध्ये १६७ जणांना अटक झाली आहे.