भंडारा येथील आगीच्या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश

मुंबई – भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला ८ जानेवारीच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. आगीची घटना कळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांसह जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली. मृत बालकांच्या कुटुंबियांसाठी शासनाकडून ५ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य घोषित करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात दोषी आढळणार्‍यांवर निश्‍चितच कठोर कारवाई केली जाईल. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल, असे म्हटले आहे.