महाराष्ट्रात दळणवळण बंदीमध्ये ३१ डिसेंबरपर्यंत वाढ

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्यामुळे राज्यशासनाने प्रतिबंधित क्षेत्रातील दळणवळण बंदी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.

खरी लोकशाही आणण्यासाठी सरकारला झुकवणारी शक्ती उभी करा ! – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

संविधान दिनाच्या निमित्ताने हजारे यांनी एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला. त्याद्वारे त्यांनी जनतेला संबोधित केले.

भाजप उमेदवारांना विक्रमी मताधिक्य देणार – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ यांची निवडणूक १ डिसेंबर या दिवशी होत असून सांगली विधानसभा मतदारसंघातून पदवीधरचे उमेदवार श्री. संग्रामसिंह देशमुख आणि शिक्षकचे उमेदवार श्री. जीतेंद्र पवार यांना विक्रमी मताधिक्य देणार असल्याचे प्रतिपादन भाजप आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन !

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा गुरसाळे (तालुका-पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत तुकाराम भालके (वय ६० वर्षे) यांचे २७ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

संग्राम देशमुख आणि जितेंद्र पवार यांना निवडून आणा ! – संजय केळकर, आमदार, भाजप

श्री. संग्राम देशमुख आणि श्री. जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ गावभाग येथील हरिदास भवन येथे पदवीधर शिक्षकांसाठीच्या मेळाव्यात ठाण्याचे भाजप आमदार श्री. संजय केळकर बोलत होते.

लसनिर्मिती प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान मोदींची भेट !

सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आलीय हे पहाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ नोव्हेंबर या दिवशी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत.

हिंदु देवतांचा अवमान करणार्‍या अनुराग बसू यांच्या ‘लुडो’ चित्रपटास ट्विटरवरून विरोध

हिंदू किती दिवस अशा प्रकारे विरोध करत रहाणार ? सरकार अशा चित्रपट आणि वेब सिरीजवर कारवाई कधी करणार ?

नौदलाच्या ‘मिग २९ के’ या प्रशिक्षण देणार्‍या विमानाला अरबी समुद्रात अपघात : एक वैमानिक बेपत्ता

भारतीय नौदलाच्या ‘मिग २९ के’ या प्रशिक्षण देणार्‍या विमानाला अरबी समुद्रात अपघात झाला. ही घटना २६ नोव्हेंबरला सायंकाळी घडली. विमानातील एका वैमानिकाला वाचवण्यात आले आहे, तर दुसर्‍याचा शोध घेतला जात आहे.

राजभवनात मुसलमानांना नमाजासाठी देण्यात आलेल्या जागेप्रमाणे हिंदूंनाही उपासनेसाठी मोठी जागा द्यावी ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

राजभवनात हिंदूंनाही उपासना, आरती, पूजा आणि उत्सव साजरे करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने राज्यपालांकडे केली आहे

कंगना राणावत यांचे कार्यालय पूर्ववत करून देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश.

या प्रकरणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे, ‘‘कंगना यांच्या कार्यालयाच्या नुकसानीचा व्यय मुख्यमंत्र्यांच्या खिशातून करावा. या सुडाच्या राजकारणाचा भुर्दंड सरकारी तिजोरीतून कशाला ?”