भाजप उमेदवारांना विक्रमी मताधिक्य देणार – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

पदवीधर निवडणुकीसाठी विविध मान्यवरांच्या भेटी घेतांना आमदार श्री. सुधीर गाडगीळ (डावीकडे) आणि अधिवक्ता गोपाळ माईणकर, तसेच सौ. स्मिता माईणकर

सांगली, २८ नोव्हेंबर (वार्ता.) – पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ यांची निवडणूक १ डिसेंबर या दिवशी होत असून सांगली विधानसभा मतदारसंघातून पदवीधरचे उमेदवार श्री. संग्रामसिंह देशमुख आणि शिक्षकचे उमेदवार श्री. जीतेंद्र पवार यांना विक्रमी मताधिक्य देणार असल्याचे प्रतिपादन भाजप आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांनी केले. श्री. देशमुख आणि श्री. पवार यांच्या प्रचारार्थ आमदार श्री. गाडगीळ यांनी विविध ठिकाणी प्रचारदौरे केले. त्या वेळी ते बोलत होते. आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी स्वतः मतदारांच्या घरी जाऊन त्यांना प्रचार पत्रके देऊन भाजपच्या दोन्ही उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

श्री. संग्रामसिंह देशमुख आणि श्री. जीतेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ सांगलीत नुकताच पदवीधरांचा मेळावा पार पडला होता. त्याला भाजपाचे प्रवक्ते माजी खासदार श्री. धनंजय महाडिक आणि ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार श्री. योगेश टिळेकर यांनी मार्गदर्शन केले.

Attachments area