नौदलाच्या ‘मिग २९ के’ या प्रशिक्षण देणार्‍या विमानाला अरबी समुद्रात अपघात : एक वैमानिक बेपत्ता

मुंबई – भारतीय नौदलाच्या ‘मिग २९ के’ या प्रशिक्षण देणार्‍या विमानाला अरबी समुद्रात अपघात झाला. ही घटना २६ नोव्हेंबरला सायंकाळी घडली. विमानातील एका वैमानिकाला वाचवण्यात आले आहे, तर दुसर्‍याचा शोध घेतला जात आहे. विमानाला अपघात कसा झाला ?, याची चौकशी करण्यात येणार आहे, असे नौदलाकडून सांगण्यात आले आहे. हे विमान विमानवाहू युद्धनौका ‘विक्रमादित्य’वर तैनात करण्यात आले होते. यापूर्वी फेब्रुवारी मासातही ‘मिग २९ के’ या विमानाला गोव्याच्या समुद्रकिनारी अपघात झाला होता. त्या वेळी वैमानिकाला वाचवण्यात यश आले होते.