अभिनेते संजय दत्त कपाळावर टिळा आणि शेंडी ठेवलेल्या खलनायकाच्या भूमिकेत !

खलनायक हे ब्राह्मण, साधू, संत, पुजारी अशा भूमिकेत दाखवून हिंदी चित्रपटसृष्टी अनेक वर्षांपासून हिंदु धर्माची अपकीर्ती करत आली आहे. आता यावर कायमस्वरूपी प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.

संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीमंडळात घेण्याची पोहरादेवीच्या महंतांची  मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीमंडळात स्थान मिळावे, या मागणीसाठी पोहरादेवीच्या महंतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून चालवण्यात येणाऱ्या ‘विद्यामाता हायस्कूल’ची मान्यता रहित करा ! – दादा कांबळे, जिल्हा सचिव, मनसे

हिंदूंना लुबाडणार्‍या आणि त्यांच्या पाल्यांना ‘जन्महिंदू’ बनवणार्‍या ख्रिस्ती शाळांवर बहिष्कार टाका !

अभिनेत्री केतकी चितळे यांना जामीन संमत !

पोलिसांनी हा गुन्हा राजकीय सूडबुद्धीने नोंद केल्याचा दावाही केतकी यांनी याचिकेतून केला होता. त्यानंतर आता केतकी यांना जामीन संमत करण्यात आला आहे.

कल्याण येथील अखिल भारत हिंदु महासभेचे प्रवक्ते कै. प्रमोद जोशी यांना हिंदुत्वनिष्ठांकडून श्रद्धांजली !

या वेळी येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांचे हिंदुत्वाचे कार्य पुढे घेऊन जाण्याचा निश्चय केला.

आषाढी वारीनिमित्त सोलापूर रेल्वे विभागाकडून १० दिवसांत १२५ विशेष फेऱ्यांचे नियोजन !

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पुणे-पंढरपूर, कुर्डूवाडी-मिरज, लातूर-मिरज, भुसावळ-पंढरपूर, नागपूर-पंढरपूर, बिदर-पंढरपूर आदी मार्गांवर विशेष रेल्वे धावणार आहेत. या गाड्यांमध्ये सर्वसामान्य (जनरल) तिकिटावर वारकऱ्यांना प्रवास करता येणार आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण !

गेल्या दोन दिवसांपासून कोश्यारी यांना कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. २१ जूनच्या रात्री चाचणीतील अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आला.

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुण्याच्या दिशेने मार्गस्थ !

या वेळी दिंडी प्रमुखांना पुष्पहार आणि श्रीफळ देऊन त्यांना वैद्यकीय उपचारासाठी प्रथमोपचार पेटी, महापालिका प्रशासन आणि त्यांचे संपर्क क्रमांक असलेली माहिती पुस्तिका, मूल्यशिक्षण अभ्यासपुस्तिका भेट देण्यात आली.

माऊलींच्या ७२५ व्या संजीवन समाधी वर्षानिमित्त ‘ज्ञानियाचा राजा’ कार्यक्रमाचे आयोजन !

श्री मारुतिबाबा कुर्हेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. दोन्ही दिवशी हरिपाठाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. दोन दिवशी व्याख्यान, कीर्तन, भारुड, अभंगगीत, भजन विराणी, ओडिसी नृत्य, गवळण, ओवी, दिंडी आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले.

पंचांगातील ‘ महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी होतील’, हे भविष्य खरे ठरले !

भारतीय पंचांग हे भविष्याचे अचूक वेध घेणारे शास्त्र आहे. पंचांगामध्ये वर्तवले जाणारे भविष्य हे नेहमीच दिशादर्शक असते. यंदाही जून मासाच्या पंचांगात वर्तवण्यात आलेल्या भविष्यामधील अनेक भाग सत्य होतांना दिसत आहेत.